इंदापुरात मिरवणुकीचा उत्साह

इंदापुरात मिरवणुकीचा उत्साह

Published on

इंदापूर, ता. १९ : येथे सकल युवा शिवभक्त परिवाराच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी पारंपरिक वाद्यांचा गजर यांच्यासह सजविलेले अश्‍व, सजलेल्या बैलगाड्या, उंट आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक लोकधारा असलेले वासुदेव, पोतराज, गोंधळी या मिरवणुकीमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेणारे ठरले.
कार्यक्रमाचा प्रारंभ महिलांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा म्हणून केला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते शिवप्रतिमा पूजन करीत पारंपरिक वाद्याच्या गजरात ढोल ताशा आणि झांज पथकाच्या निनादात निघालेल्या मिरवणुकीने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. इंदापूर महाविद्यालया समोरून मिरवणूक सोहळ्याची सुरुवात झाली. त्यानंतर चाळीस फुटी रस्त्याने भगतसिंग चौक, नेहरू चौक मार्गाने, खडकपुरा व तेथून पुन्हा जुन्या पुणे सोलापूर मार्गावरून महाविद्यालयासमोरच्या प्रांगणात समारोप करण्यात आला.
यावेळी साजविलेली बैलगाडी, वासुदेव, पोतराज, उंट, टाळकरी, गोंधळी, लाठी काठी पथक, टाळ मृदुंगाचा गजर, लेझीम पथक, तुतारीवाले तसेच तिरंगा झांजपथक वडगाव रासाई, शिरूर येथील पारंपरिक सनई ढोल ताशा पथक, यासह राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, यांची वेशभूषा परिधान करून अश्‍वावर विराजमान झालेले तसेच आकर्षक सजावट केलेला रथ सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. मिरवणूक प्रसंगी इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे, पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे आजी-माजी पदाधिकारी यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com