इंदापूरच्या भिमाई आश्रमशाळेत महिला दिन उत्साहात साजरा

इंदापूरच्या भिमाई आश्रमशाळेत
महिला दिन उत्साहात साजरा
Published on

इंदापूर, ता. ९ ः मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट इंदापूर संचलित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रमशाळा तसेच मुलांचे व मुलींचे अनुदानित वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन साजरा केला.
भीमाई आश्रमशाळेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात प्राचार्या अनिता साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन केले. यावेळी विद्यार्थिनींनी बहुजन महामातांच्या प्रतिमांना पुष्पहार व संस्थेचे दिवंगत अध्यक्ष रत्नाकर मखरे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी विद्यार्थिनींनी कर्तबगार महिलांविषयी कविता गायन तसेच मनोगते व्यक्त केली. यावेळी सहशिक्षक नानासाहेब सानप यांनी जागतिक महिला दिनाचे महत्त्व विशद केले. यावेळी शाळेतील महिला शिक्षकांचा सन्मान करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. ॲड. समीर मखरे, साहेबराव पवार, प्राचार्या अनिता साळवे, सविता गोफणे, मनीषा मखरे, मेघा यादव, नीता जगताप आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com