सोमेश्र्वर सहकारी साखर कारखान्यातर्फे ऊसतोड मजुरांच्या मुलांना शैक्षणिक साहित्य

सोमेश्र्वर सहकारी साखर कारखान्यातर्फे ऊसतोड मजुरांच्या मुलांना शैक्षणिक साहित्य

Published on

सोमेश्वरनगर, ता. ८ : ''''ऊसतोड कामगार हा अनेक पिढ्या वंचित राहिलेला घटक आहे. दर सहा महिन्याला स्थलांतर करत असल्याने त्यांच्या नव्या पिढ्याही शिक्षणापासून वंचित रहात आहेत. या मुलांना शिक्षण मिळणे हा त्यांचा हक्क आहे. सरकारी यंत्रणेसोबत सामाजिक संस्थांनीही यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे,'''' असे मत ज्येष्ठ कामगार नेते तुकाराम जगताप यांनी व्यक्त केले.
सोमेश्वर सहकारी साखर कारखाना स्थळावर कारखान्याच्याच वतीने ''कोपीवरची शाळा'' हा प्रकल्प चालतो. या प्रकल्पांतर्गत सायंकाळी पाच ते नऊ या वेळेत शालेय मुलांचे अभ्यासवर्ग घेतले जातात. सोमेश्वर कारखान्यांच्याच साखर कामगारांनी सदर प्रकल्पास भेट देऊन दोनशे मुलांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप केले. यावेळी झालेल्या अध्यक्षस्थानी तुकाराम जगताप होते. याप्रसंगी बारामती तालुका साखर कामगार सभेचे उपाध्यक्ष सुरेश होळकर, चिटणीस संग्राम चव्हाण, शिवाजी वायाळ, सुनील मदने, अशोक जगताप, भाऊसाहेब जगदाळे, सुनील क्षीरसागर, धनंजय जमदाडे, आनंद मदने, अरविंद जगताप, दिलीप सूर्यवंशी उपस्थित होते. यानिमित्ताने प्रतीक्षा गाडे, वैष्णवी सपकाळ या ऊस तोड मजुरांच्या मुलींची भाषणे झाली. अश्विनी लोखंडे, आरती गवळी, अनिता ओव्हाळ, संतोष होनमाने, संभाजी खोमणे यांच्या संयोजनामुळे खेळ, गाणी असा सांस्कृतिक कार्यक्रम असलेला ''बालमंच'' संपन्न झाला.
नौशाद बागवान यांनी प्रस्ताविक केले. रमेश जगताप यांनी सूत्रसंचालन तर अभय चव्हाण यांनी आभार मानले.
---
02336

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.