ऊस गाळपात ‘बारामती अॅग्रो’ अव्वल

ऊस गाळपात ‘बारामती अॅग्रो’ अव्वल

संतोष शेंडकर : सकाळ वृत्तसेवा
सोमेश्वरनगर, ता. १० : पुणे जिल्ह्यातील सर्व कारखान्यांचा पट्टा पाच महिन्यांतच पडला. १७ कारखान्यांनी १२६ लाख ६८ हजार टन उसाचे गाळप करत १२ लाख ६४ हजार टन साखरनिर्मिती केली आहे. मागील हंगामाच्या तुलनेत २८ लाख टनांनी गाळपात, ३८ लाख क्विंटलने साखरनिर्मितीत; तर ०.६८ टक्क्यांनी साखर उताऱ्यात घट झाली आहे. दरम्यान, गाळपात बारामती अॅग्रोने; तर साखरनिर्मिती व साखर उतारा या दोन्हीमध्ये ‘सोमेश्वर’ने आपणच ‘दादा’ असल्याचे दाखवून दिले.
जिल्ह्यात मागील हंगामात १५४ लाख टन उसाचे गाळप करत १०.६७ टक्के सरासरी साखर उतारा राखत १६४ लाख क्विंटल साखरेची निर्मिती झाली होती. चालू हंगामात ११ सहकारी व ६ खासगी कारखान्यांनी मिळून १२६ लाख ६८ हजार ७८३ टन गाळप करत १२६ लाख ४९ हजार ८७० क्विंटल साखरनिर्मिती केली. उताऱ्यात मात्र ९.९९ टक्केवरच गाडी अडली. हंगामही चार ते पाच महिनेच चालला. त्यामुळे कारखान्यांना आर्थिक फटका बसणार, हे निश्चित आहे. इथेनॉल व साखरनिर्यातीमुळे कारखाने तगून राहणार आहेत.

अपेक्षेपेक्षा कमी गाळप
कर्मयोगी, राजगड, अनुराज फेब्रुवारीतच बंद झाले. पराग, संत तुकाराम, विघ्नहर शेवटी बंद झाले. गाळपात बारामती अॅग्रोने बाजी मारली. सोमेश्वर, माळेगाव, दौंड शुगर यांनीही दहा लाखांचा टप्पा ओलांडला. बहुतांश कारखान्यांना अपेक्षेपेक्षा कमी गाळप झाले. प्रतिकूल हवामान व अतिवृष्टीमुळे एकरी उत्पन्नात झालेली घट आणि घटलेल्या उताऱ्यामुळे हंगाम लवकर आटोपता घ्यावा लागला.

साखर उताऱ्यातील घट चिंताजनक
साखर उताऱ्यात जिल्ह्याची घट चिंताजनक आहेच, पण त्यापेक्षाही नीरा भीमा, कर्मयोगी, राजगड यांचे उतारे अधिक चिंताजनक आहे. तुलनेने सोमेश्वर कारखान्याने उताऱ्याबाबत सलग सातव्या वर्षी आपणच ‘दादा’ असल्याचे दाखवून दिले आहे. १६ लाख ४३ हजार टनांचे गाळप करणाऱ्या बारामती अॅग्रोपेक्षा १२ लाख ५६ हजार टन गाळप करणाऱ्या सोमेश्वरची साखरनिर्मिती जास्त आहे. त्यापाठोपाठ भीमाशंकर, संत तुकाराम, विघ्नहर, व्यंकटेशकृपाचा साखर उतारा अत्यंत चांगला राहिला आहे.

हंगाम दृष्टीक्षेपात
साखर कारखाने - १७
एकूण ऊस गाळप- १२६ लाख ६८ हजार टन
(मागील हंगामापेक्षा २८ लाख कमी)
एकूण साखर निर्मिती- १२६ लाख ४९ हजार ८७० क्विंटल
(मागील हंगामापेक्षा ३८ लाख क्विंटल कमी)
सरासरी साखर उतारा- ९.९९ टक्के
(मागील हंगामापेक्षा ०.६८ टक्क्यांनी कमी)

सहकारी व खासगी आढावा
कारखाने संख्या गाळपक्षमता गाळप (टन) साखरनिर्मिती (क्विं) उतारा (टक्के)
सहकारी ११ ५७७५० ७८,००,३०५ ८०,४२,६२७ १०.३१
खासगी ६ ३३५०० ४,६८,४७८ ४६,०७,२४३ ९.४६

कारखाना एकूण गाळप (टन) साखरनिर्मिती (क्विं.) सरासरी उतारा (टक्के)
बारामती अॅग्रो १६,४३,९०७ १४,४८,९५० ८.८१
सोमेश्वर १२,५६,७६९ १४,६८,१५० ११.६८
माळेगाव १२,५७,४६६ १३,२८,९०० १०.५७
दौंड शुगर १०,०३,२८६ १०,१८,६९३ १०.१५
भीमाशंकर ९,१९,९८३ १०,६५,९५२ ११.५९
विघ्नहर ९,०४,३६१ १०,०२,१०० ११.०८
छत्रपती ८,९५,०६९ ९,४७,८०० १०.५९
कर्मयोगी ७,१७,९५१ ५,०६,२५० ७.०५

पराग अॅग्रो ६,३६,९०३ ५,६५,६२५ ८.८८
श्रीनाथ म्हस्कोबा ६,३०,८११ ५,४०,७२५ ८.५७
व्यंकटेशकृपा ६,२७,८४० ६,९५,१०० ११.०७
नीरा भीमा ५,६४,६८२ ३,९४,३५० ६.९८
संत तुकाराम ४,९८,३८५ ५,७०,५५० ११.४५
घोडगंगा ४,३८,३३४ ४,५०,१०० १०.२७
अनुराज ३,२५,७३१ ३,३८,१५० १०.३८
भीमा पाटस २,९४,७५५ २,६९,२२५ ९.१३
राजगड ५२,५५१ ३९,२५० ७.४७

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com