अध्यक्षपदी राजेंद्र मदने यांची निवड

अध्यक्षपदी राजेंद्र मदने यांची निवड

Published on

सोमेश्वरनगर, ता. ८ ः येथील सोमेश्वर विद्यालय सेवकांची सहकारी पतसंस्था या संस्थेच्या अध्यक्षपदी राजेंद्र मदने यांची तर उपाध्यक्षपदी मनोहर धुमाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सोमेश्वर सहकारी पतसंस्थेचे मावळते अध्यक्ष संदीप कदम व उपाध्यक्ष संग्राम भोसले यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर निवडप्रक्रिया पार पडली. मुख्याध्यापक बाळासाहेब मिंड, संचालिका प्रतिभा कुलकर्णी, जान्हवी जगताप, शरद जगदाळे, बाळासाहेब बालगुडे, राजेंद्र झुरुंगे, दीपक परकाळे, सुरेश गाढवे सोमेश्वर वाचनालयाचे अध्यक्ष कल्याण जगताप, निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ए. बी. गायकवाड यांनी काम पाहिले व संजय वाबळे यांनी सहकार्य केले. निवडीनंतर मदने यांचे सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी अभिनंदन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.