शेतकरी कृती समितीचा सुनेत्रा पवार यांना पाठिंबा

शेतकरी कृती समितीचा
सुनेत्रा पवार यांना पाठिंबा

सोमेश्वरनगर, ता. २९ : ‘‘अजित पवार शब्दाचे पक्के नेते आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात विकासाची गंगा, मोठे प्रकल्प आणण्यासाठी केंद्राच्या निधीची गरज आहे. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी त्यांची जवळीक आहे. त्यामुळे अजित पवार विकासकामे खेचून आणतील. यासाठी सुनेत्रा पवार यांना खासदार करणे आवश्यक आहे,’’ असे मत शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांनी व्यक्त केले.
गडदरवाडी (ता. बारामती) येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ शेतकरी कृती समिती तसेच सोमेश्वर कारखाना कार्यक्षेत्रातील महायुतीचे कार्यकर्ते यांचा संयुक्त मेळावा झाला. यानिमित्ताने काकडे यांनी काकडे गट व शेतकरी कृती समितीचे कार्यकर्ते सुनेत्रा पवार यांना बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे स्पष्ट केले. याप्रसंगी प्रमोद काकडे, दिलीप फरांदे, संतोष कोंढाळकर, अजय कदम, शहाजी जगताप, दिग्विजय जगताप, वैभव गायकवाड, हेमंत गायकवाड, सतीश जगताप, भाऊसाहेब हुंबरे, दयानंद चव्हाण, बबलू सकुंडे, सुरेश शेंडकर, हरिभाऊ तावरे, बाळासाहेब राऊत, भाऊसाहेब भोसले, अजित माळशिकारे आदी उपस्थित होते. अभिजित काकडे यांनी मेळाव्याचे संयोजन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com