काकडे महाविद्यालयात 
५२ संशोधन प्रकल्प सादर

काकडे महाविद्यालयात ५२ संशोधन प्रकल्प सादर

Published on

सोमेश्वरनगर, ता. ४ : येथील मु.सा. काकडे महाविद्यालयात ‘आविष्कार संशोधन स्पर्धा’ नुकतीच पार पडली. यामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वतःचे ५२ संशोधन प्रकल्प सादर केले. यानिमित्ताने ‘संशोधनाचे महत्त्व’ या विषयावर शरदचंद्र पवार अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय देवकर यांचे व्याख्यान आयोजित केले होते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार काकडे महाविद्यालयाने या स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये कला, वाणिज्य, विज्ञान व संगणक या चार शाखांतील ५२ विद्यार्थ्यांनी आपले संशोधन प्रकल्प सादर केले. यात महिला सुरक्षा उपकरण, कृत्रिम बुद्धिमत्ता उपकरण, शेती विकास प्रकल्प, टाकाऊ प्लॅस्टिकपासून वीटनिर्मिती, अपारंपरिक वीजनिर्मिती, आरोग्य तपासणी यंत्र, पाणी बचत उपकरण, बँका व सामाजिक विकास, भाषाकुल संकल्पना अशा विविध विषयांवरील प्रकल्पांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते.
स्पर्धेचे उद्‍घाटन डॉ. देवकर यांच्या हस्ते झाले. ते म्हणाले की, संशोधन फक्त संगणकाचे किंवा यंत्राचे नसते. भाषा, संस्कृती, इतिहास, मानववंश अशा विविध क्षेत्रात संशोधनासाठी प्रचंड वाव आहे. समाजाला दिशा देण्यासाठी संशोधन उपयुक्त ठरले पाहिजे. संशोधन कार्यामुळे शोध लागतीलच याची हमी नसली तरी चिकित्सक वृत्ती वाढते.
मानवी उत्क्रांतीपासून ते आजअखेर मानवी जीवनात जे बदल झालेत ते संशोधनामुळेच झाल्याचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी विद्यार्थ्यांसमोर सप्रमाण मांडले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. श्रीकांत घाडगे यांनी केले. डॉ. प्रवीण ताटे यांनी आभार मानले.

सोमेश्‍वरनगर (ता. बारामती) : काकडे महाविद्यालयातील आविष्कार संशोधन स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मांडलेले विविध प्रकल्प.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com