रोजंदारीवरील कामगारांना 
‘सोमेश्‍वर’चा गोड निर्णय

रोजंदारीवरील कामगारांना ‘सोमेश्‍वर’चा गोड निर्णय

Published on

सोमेश्वरनगर, ता. ९ : येथील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने सलग सात वर्ष रोजंदारी (कंत्राटी) पद्धतीने कार्यरत असलेल्या कामगारांना आता कारखान्याच्या सेवेत घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता ८९ रोजंदारी मजूर हे ‘साखर कामगार’ बनणार आहेत, अशी माहिती सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.
अनेक वर्षे कारखान्यात मजूर म्हणून राबणाऱ्यांना मागील काही महिन्यांपासून संचालक मंडळ कायम सेवेत घेण्याचा विचारात होते. तसेच, साखर कामगार संघटनांनीही आग्रही मागणी केली होती. हा निर्णय विधानसभा निवडणुकीआधी होणार की नंतर ही उत्सुकता होती. संचालक मंडळाने बुधवारी (ता. ९) झालेल्या मासिक सभेत मध्यम मार्ग काढत सात वर्षे काम केलेल्या रोजंदारी कामगारांसाठी दिवाळी भेट दिली आहे. त्यामुळे ८९ रोजंदारी कामगार आता टप्प्याटप्प्याने कारखान्याच्या कायम सेवेत समाविष्ट केले जाणार आहेत.
व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार, ८९ रोजंदारी कामगारांना ४०० ते ४५० रुपये दैनंदिन पगार होता. त्यांना आता कारखान्याच्या हजेरी पत्रकावर आणि एकत्रित पगारावर घेतले जाणार आहे. सुरवातीला आधीपेक्षा पगारात थोडीफार वाढ होईल. त्यानंतर स्टाफिंग पॅटर्ननुसार टप्प्याटप्प्याने कायम सेवेत समाविष्ट केले जाणार आहे. कारखान्याची वेतन क्षमता, प्रायव्हेट फंड रक्कम भरण्याची क्षमता, स्टाफिंग पॅटर्न या बाबींचा विचार करून पुढील कार्यवाही केली जाणार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com