बाहेरील कारखान्यांच्या प्रलोभनास बळी पडू नका

बाहेरील कारखान्यांच्या प्रलोभनास बळी पडू नका

Published on

सोमेश्वरनगर, ता. १६ : शेतकऱ्यांनी नोंदविलेला सर्व ऊस २० ते २५ मार्चपर्यंत ''सोमेश्वर'' संपवणार आहे. त्यामुळे सभासदांनी बाहेरच्या कारखान्यांच्या प्रलोभनास बळी पडून अन्यत्र ऊस घालू नये, असे आवाहन सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी केले आहे. तसेच, नोंदविलेला ऊस जर सभासदांनी बाहेरच्या कारखान्यांना घातला तर कारखान्याकडून दिल्या जाणाऱ्या सर्व सवलती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
सोमेश्वर कारखान्याने ९३ दिवसांमध्ये ८ लाख ६१ हजार टन उसाचे गाळप केले असून सरासरी ११.५१ टक्के साखर उताऱ्याने ९ लाख ८८ हजार क्विंटल साखरनिर्मिती केली आहे. कारखान्याची गाळपक्षमता ७५०० टन प्रतिदिन असतानाही सरासरी ९२६२ टन प्रतिदिन क्षमतेने गाळप सुरू आहे. सहवीजनिर्मिती प्रकल्पातून ६ कोटी १४ लाख युनिट वीजनिर्मिती केली असून त्यापैकी ३ कोटी ५७ लाख युनिट वीज वीजकंपनीस विक्री केलेली आहे. याशिवाय डिस्टिलरी प्रकल्पातून ४२ लाख ६० हजार लिटर अल्कोहोलचे तर २३ लाख १७ हजार लिटर इथेनॉलचे उत्पादन घेतले आहे.

तरच उच्चांकी दराची परंपरा जपणे शक्य
राज्यसरकारच्या निर्णयामुळे सोमेश्वर पंधरा दिवस उशिरा सुरू झाला. तरीही सर्व ऊस २५ मार्चपर्यंत संपविणार आहोत. कोणताही साखर कारखाना दीडशे दिवस पूर्ण क्षमतेने चालला तरच त्याच्या कार्यक्षमतेचा पूर्ण वापर होतो. जेवढे जास्त गाळप तेवढा उत्पादन खर्च कमी. गाळप वाढल्यास साखर, वीज, अल्कोहोल उत्पादन वाढून उच्चांकी दराची परंपरा जपणे शक्य होईल. सुदैवाने सोमेश्वरकडे समाधानकारक ऊस आहे. पण आजूबाजूच्या कारखान्यांनी गाळपक्षमता वाढविल्याने त्यांना उसाची कमतरता भासत आहे. अशा स्थितीत सोमेश्वरच्या कार्यक्षेत्रातील ऊस कुठलीही तारीख न पाहता तोडून नेण्याचे प्रलोभन दाखवत आहेत.

ऊसतोड कामगार जर तोडणीसाठी पैसे मागत असतील किंवा बिगरसहमतीने ऊस जळीत करून तोडत असतील तर लेखी तक्रार दिल्यास त्यांच्या ऊसतोडणी बिलातून वसुली केली जाईल.
- पुरुषोत्तम जगताप, अध्यक्ष, सोमेश्वर साखर कारखाना

‘कारवाईची वेळ येऊ देऊन नये’
सोमेश्वर तुटणाऱ्या पूर्वहंगामी उसाला प्रतिटन ७५ रुपये तर सुरू व खोडव्याला प्रतिटन १५० रुपये अनुदान देत आहे. हंगामही लवकर संपतोय. असे असतानाही जे बाहेर ऊस घालून कारवाई करण्याची वेळ संचालक मंडळावर येऊ देऊ नये अशी विनंती पुरुषोत्तम जगताप यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com