

सोमेश्वरनगर, ता. १० ः अवघ्या ११० दिवसांत महाराष्ट्राचा साखर हंगाम आटोपण्याच्या मार्गावर आहे. आतापर्यंत तब्बल १३९ कारखान्यांची धुराडी थंडावली असून ६१ कारखाने सुरू आहेत. गतहंगामातील या दिवशी १५३ कारखाने सुरू होते. आतापर्यंत राज्यात ८२६ लाख टन उसाचे गाळप झाले असून ७७ लाख टन साखरनिर्मिती झाली आहे. गतहंगामाच्या तुलनेत याहंगामात साखरनिर्मितीत २१ लाख टन तर साखर उताऱ्यातही ०.६८ टक्के इतकी घट झाली आहे.
राज्य सरकारने उशिरा हंगाम सुरू केल्यानंतरही ९ मार्चअखेर दोनशेपैकी १३९ कारखान्यांचा ९० ते ११० दिवसांत बंद झाले आहे. चालू हंगामात ८८ लाख टन साखरनिर्मिती होईल, असा अंदाज होता. मात्र, ८२ ते ८३ लाख टन साखरनिर्मितीवर गाडे अडेल, अशी शक्यता आहे. प्रतिकूल हवामानामुळे एकरी उत्पादन आणि साखर उतारा घटला. शिवाय खासगी कारखान्यांचा ‘घास’ प्रचंड वाढल्याने गाळप झपाट्याने उरकले. सोलापूर व कोल्हापूर विभागांचा हंगाम संपल्यात जमा आहे. अहिल्यानगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर विभागांतील काही कारखाने सुरू आहेत.
गतहंगामात आतापर्यंत ९८५ लाख टन गाळप होऊन १०.०९ टक्के साखर उताऱ्याने ९९ लाख टन साखरनिर्मिती झाली होती. चालू हंगामात मात्र आतापर्यंत ८२६ लाख टन गाळप होऊन ९.४१ टक्के साखर उताऱ्याने ७७ लाख टन साखरनिर्मिती झाली आहे. गतहंगामापेक्षा सद्यःस्थितीत साखरनिर्मितीमध्ये २१ लाख टन घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कारखान्यांसाठी आर्थिकदृष्ट्या ही चिंतेची बाब आहे. गाळपात कोल्हापूर विभाग गाळप (२०१ लाख टन), साखरनिर्मिती (२२२ लाख क्विंटल) व साखर उतारा (११.०५ टक्के) या तिन्ही बाबतीत प्रथम क्रमांकावर आहे.
सर्वाधिक गाळप करणारे प्रथम दहा कारखाने
बारामती अॅग्रो, पुणे १६ लाख ९० हजार
दौंड शुगर, पुणे १४ लाख ९१ हजार
जवाहर, हुपरी १३ लाख ५५ हजार
जरंडेश्वर, कोरेगाव १३ लाख ४० हजार
इंडिकॉन, कर्जत १२ लाख ३३ हजार
तात्यासाहेब कोरे, वारणानगर ११ लाख ५१ हजार
कृष्णा, रेठरे बुद्रुक ११ लाख ५० हजार
विठ्ठलराव शिंदे, माढा ११ लाख २४ हजार
सोमेश्वर, बारामती १० लाख ७२ हजार
दत्त, शिरोळ - १० लाख ७० हजार
विभागनिहाय गाळप (साखरआयुक्तालयाच्या अहवालानुसार)
विभाग कारखाने गाळप (लाख टन) साखर (लाख क्विंटल) साखर उतारा(टक्के) बंद झालेले कारखाने
कोल्हापूर ४० २०१.०६ २२२.२४ ११.०५ ३५
पुणे ३१ १९४.४७ १८५.०४ ९.५२ २०
सोलापूर ४५ १३०.०६ १०५.३७ ८.१० ४३
अहिल्यानगर २६ ११०.८२ ९७.७६ ८.८२ ९
नांदेड २९ ९६.७७ ९३.१८ ९.६३ १८
छत्रपती संभाजीनगर २२ ७९.८१ ६३.६६ ७.९८ १४
अमरावती ४ १०.६९ ९.४८ ८.८७ -
नागपूर ३ ३.२३ १.६८ ५.२० -
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.