संचमान्यता धोरणाविरोधात  
सोमवारी राज्यभर आंदोलन

संचमान्यता धोरणाविरोधात सोमवारी राज्यभर आंदोलन

Published on

सोमेश्वरनगर, ता. १२ : १५ मार्च २०२४ चे संचमान्यता धोरण शिक्षण व्यवस्थेवर दूरगामी परिणाम करणारे आहे. त्यामुळे या निर्णयाविरुद्ध येत्या सोमवारी (ता. १७) एकाच दिवशी संपूर्ण राज्यात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य कोषाध्यक्ष नंदकुमार होळकर व जिल्हाध्यक्ष सुनील वाघ यांनी दिली.
संचमान्यतेच्या नवीन निकषानुसार शिक्षण क्षेत्राला कोंडीत पकडून शिक्षक संख्या कशा पद्धतीने कमी होईल व भविष्यात शिक्षक भरती करावी लागणार नाही, असे धोरण राबवले जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सरकारी शाळा या निर्णयामुळे मोडकळीस येणार आहेत. पर्यायाने गोरगरीब, दलित व बहुजनांची मुले, तसेच डोंगराळ दुर्गम व अति दुर्गम भागात शिक्षण घेणारी मुले शिक्षणापासून वंचित राहणार आहेत.
यापूर्वी पहिली ती पाचवीपर्यंत ६१ पटाला तीन शिक्षक पूर्वी होते, आता ७६ पट झाला तरच तिसरा शिक्षक मिळणार आहे. सहावी ते आठवी वर्गासाठी वीस पटाच्या पुढे दोन शिक्षक मिळत होते, आता एकही शिक्षक देण्यात येणार नाही, अशी रचना होणार आहे. स्वतःच्या गावातीलच शिक्षण मिळवण्याचा हक्क डावलणारा शासन निर्णय रद्द झाला पाहिजे, या मागणीसाठी शिक्षक समितीच्या वतीने १७ मार्च २०२५ रोजी संपूर्ण राज्यात आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत शिक्षण आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदींना निवेदने देण्यात आली आहेत, असे होळकर यांनी सांगितले.
दरम्यान, पुणे जिल्हा परिषदेसमोर साडेअकरा ते अडीच या वेळेत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती समितीचे जिल्हा सरचिटणीस संदीप जगताप यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com