हार्वेस्टरने तुटणार ‘सोमेश्वर’चा ऊस
सोमेश्वरनगर, ता. २ : ऊसतोड कामगारांची टंचाई आणि फसवणुकीचे वाढते प्रमाण या पार्श्वभूमीवर ‘सोमेश्वर’ने तब्बल तीस हार्वेस्टरशी (ऊसतोडणी यंत्र) करार केला आहे. तोडडीसाठी शेतकऱ्यांनी पट्टापध्दतीचा अवलंब करावा. हंगामात तीन लाख टन ऊस हार्वेस्टरने तोडण्याचे उद्दीष्ट आहे, अशी माहिती ‘सोमेश्वर’चे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप व कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी दिली. तसेच, , असे आवाहनही केले.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा रोलर पूजन समारंभ उपाध्यक्ष मिलिंद कांबळे व संचालक अभिजित काकडे यांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी माजी उपाध्यक्ष बाळासाहेब कामथे, संचालक सुनिल भगत, संग्राम सोरटे, शैलेश रासकर, लक्ष्मण गोफणे, ऋषी गायकवाड, किसन तांबे, जितेंद्र निगडे, हरिभाऊ भोंडवे, अजय कदम, तुषार माहूरकर, एन. एच. नायकोडे उपस्थित होते.
याप्रसंगी जगताप म्हणाले, सोमेश्वरकडे २०२५-२६ हंगामात गाळपासाठी ३५ हजार एकर म्हणजेच बारा-साडेबारा लाख टन ऊस उपलब्ध आहे. यासाठी तोडणी वाहतूक यंत्रणेचे करार वेळेत पूर्ण केले असून पहिल्या हप्त्याचे वाटपही झाले आहे. यामध्ये ११२० बैलगाडी, ६०० डंपिंग, २० ट्रक, ३७० ट्रॅक्टर व ३० हार्वेस्टरचा समावेश आहे. २०२४-२५ हंगामात हार्वेस्टरद्वारे दीड लाख टन ऊस तोडला होता. येत्या हंगामात तीन लाख टन तर २०२६-२७ हंगामात सहा लाख टन ऊस हार्वेस्टरने तोडण्याचे उद्दीष्ट आहे. किमान साडेचार फूट पट्टापद्धतीची लागवड असेल तर हार्वेस्टरने ऊस तोडता येतो. हार्वेस्टरने तोडलेला ऊस लवकर खाली करता यावा साडेपाच हजार टनी मिलला कॅरिअर आधीच केलेले आहे. अधिक संख्येने वाहने खाली करता यावीत यासाठी दुसऱ्या अडीच हजार टनी मिललासुध्दा कॅरिअर करून घेत आहोत.
येत्या हंगामात पहिल्या दिवसापासून कारखाना नऊ ते साडेनऊ हजार टन प्रतिदिन क्षमतेने चालेल व ३६ मेगावॅट क्षमतेने वीज तर ३० हजार लिटर प्रतिदिन क्षमतेच्या डिस्टिलरीतून ४५ हजार लिटर प्रतिदिन क्षमतेने अल्कोहोल तयार होईल. डिस्टिलरीची क्षमता आणखी साठ हजार टनांनी वाढविली जाणार असून नुकतेच राज्य सरकारच्या खरेदी समितीने मोज (MOJJ) कंपनीकडे डिस्टिलरीचे तर थर्म्याक्स कंपनीकडे बॉयलरचे काम देण्याचे निश्चित केले आहे. लवकरच करार होऊन काम सुरू होईल आणि त्यापुढील पंधरा महिन्यात एकूण ९० हजार लिटर प्रतिदिन क्षमतेची डिस्टिलरी उभी राहणार आहे.
''सोमेश्वर''कडे नोंदवलेला ऊस (एकरांत)
आडसाली - १४४९२
पूर्वहंगामी - ७९१६
सुरू हंगामी - ४१३२
खोडवा - ८९७२
04684
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.