महाराष्ट्राच्या अपेक्षा पूर्ण करण्याची धमक असणारा नेता
आपल्या बारामती मतदारसंघात, पालकमंत्री असलेल्या पुणे व बीड या दोन्ही जिल्ह्यांत आवश्यक तेवढा वेळ देऊन मंत्रालयातसुद्धा जनतेला सर्वाधिक वेळ देणारा नेता म्हणजे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार! दादांच्या मजबूत खांद्यावर आता सबंध महाराष्ट्राच्या अपेक्षांचे ओझे आहे. त्या पूर्ण करण्याची धमकही त्यांच्यातच आहे. अर्थमंत्री या नात्याने सगळ्या राज्याच्या विकासाची जबाबदारी खांद्यावर पेलत असताना दिवस-दिवस मंत्रालयात बैठका घेतात. वेळप्रसंगी घरून आणलेला डबासुध्दा खायला वेळ मिळत नाही. मंत्रालयात नव्वद टक्के उपस्थिती असणारे ते एकमेव नेते आहेत. जनतेसाठी पहाटे उठून रात्री उशिरापर्यंत राबणारा आणि वेळप्रसंगी उपाशी राहून लोकांचे प्रश्न सोडविणारा असा नेता होणे नाही...!
- धैर्यशील रमेशराव काकडे, युवा नेते - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
निंबूत ता. बारामती
सध्या सर्वत्र भावनेवर आधारित राजकारणाचे दिवस आहेत. कुणी जाती-पातीच्या भावनेवर, कुणी हिंदी-मराठीच्या भावनेवर, कुणी धर्माच्या भावनेवर, कुणी भाषा-राज्य-प्रांत अशा भावनांवर राजकारण करत असल्याचे दिसते. इथेच अजितदादा पवार यांचे वेगळेपण अधोरेखित होते. त्यांचे राजकराण हे फक्त विकासकामावर, प्रकल्पउभारणीवर, रोजगार उभारणीवर आहे, होते आणि राहील. अत्यंत कठोरपणे प्रशासनाला हाताशी धरत ते प्रत्यक्ष कृती करतात आणि रिझल्ट देतात. अगदी लोकसभेच्या, राज्याच्या निवडणुकांपासून माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीपर्यंतचे उदाहरण घ्या. अजितदादांनी जात-धर्मापासून भावकी-गावकीपर्यंतचे कसलेच वाद खेळले नाहीत. अगदी माळेगाव कारखानासुध्दा ‘राज्यात सगळ्यात चांगला चालवून दाखवतो, सर्वोच्च भाव देतो’ असे सांगून सभासदांची मने जिंकली. वास्तविक अजितदादांनी कधीच भेद निर्माण करणाऱ्या प्रश्नांवर राजकारण केले नाही. कुणाचे लांगूलचालनही केले नाही, कुणाला वाईट वागणूकही दिली नाही. कारण अजितदादांसाठी महाराष्ट्रातली सगळी जनता समान आहे. आपल्या भाषणांमधून अजितदादा तेच बोलतात. म्हणतात, ‘हा महाराष्ट्र शाहू, फुले, आंबेडकर यांच्याच विचारांवर चालेल.'' किंवा ''जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत संविधानाला कुणी हात लावू शकत नाही.’ अजितदादा हे बोलतात तसे वागतात हे राज्याच्या जनतेला माहीत आहे. त्याचमुळे जनतेने विधानसभेला अजितदादांच्या वक्तव्यावर विश्वास ठेवत राष्ट्रवादीला आणि सोबत महायुतीला भरघोस यश दिले.
राज्य चालविण्याची धमक
अजितदादा सत्तेवर बसले की ते पक्षाचे नेते नसतात, जिल्ह्याचे नेते नसतात तर राज्यातील तमाम जनतेचे उपमुख्यमंत्री असतात. दादांच्या रूपाने राज्याला अत्यंत मॅच्युअर आणि परिपूर्ण असे नेते मिळाले आहेत. त्यांचे विचार संतुलित आणि विकासाची भाषा करणारे आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात जनतेला सर्वाधिक वेळ देणारा असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अनेक लोक सहभागी होऊ लागले आहेत. तरुणांचा ओढा अजितदादांकडेच आहे. कारण ते काम करतात. सत्तेत जाऊन त्यांनी काही दिवसातच शेतकऱ्यांची थकलेली वीजबिलमाफी करून दाखविली, राज्यातल्या तमाम बहिणींना लाडकी बहिण योजना आणली. विरोधक म्हणत होते की निवडणूक झाल्यावर योजना बंद पडेल. परंतु शेतकरी वीजपंपाची विजबिलमाफीची योजनाही चालू राहिली आणि लाडक्या बहिणींसाठी आर्थिक तरतूदही अर्थमंत्री म्हणून अजितदादांनी करून दाखविली आणि वारकऱ्यांनाही वारीसाठी मदत केली. त्यामुळे या योजना निवडणुकीपुरत्या नव्हत्या हा शब्द दादांनी खरा केला आहे. त्यांच्या अर्थमंत्रीपदाच्या काळात महाराष्ट्राचा जीएसटी संकलनात देशात प्रथम क्रमांक आला आहे. निधी उभा कसा करायचा आणि तो सुनियोजित पद्धतीने विकासासाठी कसा वापरायचा याचा परिपाठच त्यांनी घालून दिला आहे. स्वतःच्या बारामती तालुक्यात त्यांनी हजारो कोटींचा निधी आणून अत्यंत दर्जेदार, सुनियोजित, देखणे काम उभे केले आहे. हे पाहून राज्यातील सगळ्या तालुक्यांना वाटते आपण बारामतीसारखे व्हावे. अजितदादाच अशा पद्धतीने राज्याचा विकास करण्याची धमक बाळगून आहेत.
बारामतीचे मॉडेल !
बारामतीत येऊन आजी-माजी पंतप्रधानांनी बारामतीचे कौतुक केले आहे. पंतप्रधान चंद्रशेखर यांच्यापासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांच्यापर्यंत अनेकांनी स्पष्ट शब्दात बारामतीच्या मॉडेलला नावाजले आहे. त्यामुळेच १९६७ पासून आजतागायत जनता पवार कुटुंबाच्या मागे आहे. बारामतीचे मॉडेल असे एकाएकी विकसित झालेले नाही. राज्यात मंत्रालयात, राष्ट्रवादी भवनमध्ये, देवगिरीवर अजितदादा राज्यातील लोकांचे प्रश्न अथकपणे सोडवत असतात. यासोबत पुणे जिल्ह्याला आणि विशेषतः आपल्या बारामती तालुक्याला आजिबात विसरले नाहीत. सध्या आठवड्यातून पाच दिवस मंत्रालयात. पुणे व बीड जिल्ह्याला एक-दोन दिवस आणि बारामतीला हवा तेव्हा वेळ अजितदादा देत असतात. कॅबिनेटची मीटिंग मुंबईत घेऊन सायंकाळी बारामतीत लोकांच्या कामासाठी पोचणारा हा नेता आहे. पहाटे पाचला उठून विकासकामांची पाहणी करणारा कोणता नेता कोणत्या तालुक्याला मिळाला आहे हे सांगावे? काही नेते उठेपर्यंत अजितदादांनी दिवसभराची कामे उरकून मंत्रालय गाठलेले असते. हे करताना बारामतीत जनता दरबार भरवून प्रत्येकाचा प्रश्न सोडविल्याशिवाय जात नाहीत. अगदी सभा सुरू असल्या आणि कागद आला तर सभेतल्या सभेत कागद वाचून संबंधित अधिकाऱ्याला प्रश्न सोडवायला सांगतात. त्यांच्याकडे प्रश्न सोडवण्यासाठी कुठल्याही बारामतीकराला नेत्याला, पदाधिकाऱ्याला, पुढाऱ्याला सोबत न्यायची गरज नसते. कुणीही सामान्य माणूस, फाटका माणूस त्यांच्याकडे रांगेत उभा राहून पोचतो आणि काम करून घेतो. या बारामतीत सोमेश्वर व माळेगाव हे सहकारी कारखाने राज्यात उच्चांकी भाव देतात. बारामती दूध संघ, खरेदी विक्री संघ, सहकारी सोसायट्या, बारामती सहकारी बँक, पुणे जिल्हा सहकारी बँक हा सगळा सहकार अजितदादांच्या नेतृत्वाखाली किती सक्षमपणे चालतो हे महाराष्ट्राला सांगायची गरज नाही. त्यामुळेच बारामतीचे हे विकासाचे मॉडेल अजितदादांच्या कष्टावर उभे असून राज्यभरात अनुकरणीय आहे.
विकासकामात वहिनींची साथ
सुनेत्रावहिनींची दादांना साथ होतीच आता राज्यसभेवर खासदार झाल्याने विकासात भरच पडत आहे. वहिनींनी हायटेक टेक्स्टाईल पार्कच्या माध्यमातून हजारो महिलांना रोजगार दिला आहे. त्यामुळे बारामती, इंदापूर, दौंड तालुक्यातील हजारो वंचित महिलांना हक्काचा रोजगार मिळू शकला. त्यांची कुटुंब सावरू शकली. याशिवाय त्यांनी २०१० मध्ये एन्व्हायरमेंटल फोरमची स्थापना करत पर्यावरणात मोलाचे काम केले. अजितदादा स्वच्छतामंत्री असताना राज्यभरात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान जोरात चालले होते. त्यावेळी वहिनींनी स्वतः पुढाकार घेऊन, गावकऱ्यांच्या बैठका घेऊन काटेवाडी गावाच्या स्वच्छतेचा विडा उचलला. काटेवाडी निर्मलग्राम झाले आणि अजितदादांना राज्यभरात अभिमानाने आम्ही केले तुम्हीही करा असे सांगता आले. ८९ निर्मलग्राम बनलेल्या गावांचे त्यांनी नेतृत्व केले आहे.
दादांच्या नेतृत्वाखाली असंख्य कामे उभी
इको व्हिलेज संकल्पनेच्याही त्या प्रणेत्या आहेत. विद्या प्रतिष्ठान, बारामती क्लब, कृषी मूल उद्योग संस्था या मोठ्या संस्थांच्या त्या विश्वस्त आहेत. महत्वाचे म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात त्यांनी प्रतिनिधित्व करताना व्यवस्थापन समिती सदस्या म्हणून मोलाची शैक्षणिक कामगिरी केली. मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर, महिला आरोग्य शिबिर, कर्करोग शिबिर, मासिक जागर अभियान, पाण्यासाठीचा प्रोजेक्ट मेघदूत, कोरोनाकाळातील काम, विज्ञान जत्रा, विज्ञान प्रदर्शन अशा असंख्य कामे त्यांच्या नेतृत्वाखाली उभी राहिली आणि लोकांना उपयुक्त ठरली. याच ज्ञानाच्या शिदोरीच्या बळावर त्या खासदार म्हणून संसदेत लक्षणीय कामगिरी करतील आणि बारामती लोकसभा मतदारसंघासाठी विकासकामांकरिता निधी खेचून आणतील यात कुठलीही शंका नाही.
दादांच्या खांद्यावर अपेक्षांचे ओझे
राज्यभरात दादांची तरुणांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. राज्यभरात आम्ही जिथे जातो तिथे नेते, कार्यकर्ते दादांची कार्यपध्दती समजून घेतात. दादांच्या कामाचा धडाका कौतुकास्पद असल्याचे सांगतात. अनेकजण दुसऱ्या पक्षाचे असले तरी दादांच्या नेतृत्वाखाली काम करायची इच्छा प्रदर्शित करतात. दादांशी आमची ओळख करून द्या म्हणून मागे लागतात. कारण लोकांना दादांची भाषणे, गावरान भाषा, प्रश्न सोडविण्याची धमक, प्रशासनावर कमांड या गोष्टींमुळे दादा आपलेसे वाटतात. मीही वैयक्तिक दादांचा चाहता आहे. माझे आजोबा प्रतापसिंह ऊर्फ संभाजीराव बंडोबा काकडे यांनी १९६३ पासूनच पवार कुटुंबीयांना साथ दिली आहे. तीच परंपरा माझे वडील रमेशभैय्या प्रतापसिंह काकडे यांनी निष्ठेने पाळली. विशेष म्हणजे हाच वारसा मला मिळाला हे माझे भाग्यच.
नव्या-जुन्याचा संगम घालत नव्या नेतृत्वाची निर्मिती
पुढील काळात दादांनी पक्षात शिस्त आणायला सुरुवात केली आहे. नव्या-जुन्याचा संगम घालत नवे नेतृत्व ते तयार करत आहेत. आमची अशी अपेक्षा आहे की दादांनी, पक्षाशी निष्ठावान, पक्षाशी वैचारिक बांधिलकी जपणारांना बळ द्यावे. दादा जसे सामान्य माणसांशी संवाद करतात. तसेच राज्यातील प्रमुख नेतेमंडळींना त्यांनी राज्यभर दौरे काढायला लावावेत आणि जनतेचे, सामान्य लोकांचे प्रश्न समजून घ्यायला आणि संवाद करायला सांगावा. तरुण पिढीला जोडून घेण्याचे, वैचारिक शिबिरांचे उपक्रम राबवावेत. संविधान जागृती यात्रा, कार्यकर्ता शिबिरे, देश व राज्य समजून घेण्याच्या कार्यशाळा राबवाव्यात जेणेकरून नव्या पिढ्या विचारी बनतील.
अखेरीस अजितदादा नावाच्या विकासपुरूषास वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा…!!
---
(शब्दांकन : संतोष शेंडकर, सोमेश्वरनगर)
04703, 04704
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.