अपहारप्रकरणी दहा जणांवर गुन्हे दाखल

अपहारप्रकरणी दहा जणांवर गुन्हे दाखल

Published on

सोमेश्‍वरनगर, ता. १३ : निंबूत (ता. बारामती) येथील गणेश ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेतील सुमारे दीड कोटी रुपयांच्या अपहारप्रकरणी ऑक्टोबर २०२४ मध्ये सचिव व लेखनिक अशा दोघांवर गुन्हा दाखल झाला होता. आता पुढील तपासानंतर पतसंस्थेचे अध्यक्ष, संचालक व लेखापरीक्षक अशा आणखी १० जणांवर वडगाव निंबाळकर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
निंबूतचा पत्ता असलेली परंतु नीरा (ता. पुरंदर) येथे कार्यालय असलेल्या या पतसंस्थेतील साधारण दीड कोटी रुपयांच्या अपहारप्रकरणी ३ ऑक्टोबर २०२४ मध्ये सचिव सतीश वसंतराव काकडे व लेखनिक नीलेश नरहरी कुलकर्णी (रा. नीरा, ता. पुरंदर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. सहकार विभागाच्या मार्गदर्शनाखाली के. डी. मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२३ या कालावधीचे लेखापरीक्षण केले होते. यानंतर मोरे यांनीच वडगाव निंबाळकर पोलिसांत फिर्याद दिली होती. काकडे व कुलकर्णी यांनी दिशाभूल करणारे खोटे व्यवहार नोंदवून सभासदांची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले होते.
याप्रकरणी पुढील तपासात संस्थेचे अध्यक्ष राहुल विलास काकडे व त्यांच्या नातेवाइकांनी प्रापंचिक खर्चासाठी पैसे वापरल्याचे समोर आले आहे. घरगुती मिठाई, जलवाहिनी, विमान तिकीट, जेसीबी भाडे अशा स्वरूपाच्या नोंदी आढळून आल्या आहेत. त्याच दरम्यान, पतसंस्थेचे लेखापरीक्षण प्रमाणित लेखापरीक्षक राहुल आदलिंगे व शेखर शिंदे यांनी केले होते. त्यांनीही संस्थेचे खोटे लेखापरीक्षण करून खोटा अहवाल शासनास सादर केला. याबाबत त्या लेखापरीक्षकांनी शासनाची माफीही मागितली आहे. या बाबींचे पुरावे मिळाल्याने अध्यक्ष, संचालक व लेखापरीक्षकांवरही अपहाराचा गुन्हे दाखल केल्याची माहिती वडगाव निंबाळकर पोलिसांनी दिली, तसेच आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

नव्याने गुन्हे दाखल झालेल्यांची नावे : राहुल विलास काकडे (अध्यक्ष), उमेश उत्तम काकडे, औदुंबर दिगंबर ननवरे, रामचंद्र मल्हारराव रणवरे, अविराज बाळासाहेब काकडे, सुवर्णा अभय काकडे, रोहिणी रतन काकडे, रतन शंकर बनसोडे (सर्व संचालक), शेखर विलास शिंदे व राहुल श्रीरंग आदलिंगे (लेखापरीक्षक).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com