सौराष्ट्रातील सोरटी सोमनाथाचे प्रतिरूप ‘सोमेश्वर’
संतोष शेंडकर : सकाळ वृत्तसेवा
सोमेश्वरनगर : करंजे (ता. बारामती) येथील श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान हे सौराष्ट्रातील सोरटी सोमनाथाचे प्रतिरूप मानले जाते. महाशिवरात्र आणि श्रावण महिन्यात राज्यभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येथे येतात. करंजे गावातील सती मालूबाई या सोमेश्वराची निस्सीम भक्त असलेल्या महिलेच्या भक्तीने प्रसन्न होऊन सोरटी सोमनाथ ‘सोमेश्वर’ रूपात प्रकट झाले अशी दंतकथा सांगितली जाते. आजही ‘सोमेश्वर’ देवाची पालखी महाशिवरात्रीला सती मालूबाईबाईला भेटायला जाते. मालूबाईची खणा-नारळाने ओटी भरण्याचा मान आजही परंपरेप्रमाणे बारामती तालुक्यातील खोमणे कुटुंबीयांना आहे. दरम्यान खरे-खोटे करण्यासाठी मंदिरामध्ये तिर्थाच्या बारवेतील मूर्तीरूपी नागराजाजवळ शपथा घेण्याचीही परंपरा आहे. कोकण, ठाणे-मुंबई पट्ट्यातील कोळी बांधव सोमेश्वराचे पारंपरिक भक्त आहेत.
मंदिराजवळील मंदिराजवळील पाहण्याची पर्यटनस्थळे
१. सोमेश्वर मंदिरानजीक नयनरम्य पार्वती तलाव.
२. लोणी-भापकर येथे शंकराचे हेमाडपंथी मंदिर, दुर्मीळ वराहमूर्ती
३. वीरगळ आणि कामशिल्पे व देवदेवतांच्या मूर्तींनी युक्त बारव
४. माळवाडी-जोशीवाडी येथे सती मालूबाईच्या मंदिराच्या उभारणीचे काम सुरू
* पुण्याहून येण्याचा मार्ग-
स्वारगेट-जेजुरी-मोरगाव-मुर्टी-सोमेश्वर मंदिर किंवा स्वारगेट-, जेजुरी, नीरा, करंजेपूल-सोमेश्वर मंदिर हे दोन्ही मार्ग साधारण ८५ किमी आहेत.
सोयीसुविधा -
१. दर सोमवारी तसेच श्रावण महिन्यात दररोज सकाळी व संध्याकाळी महाप्रसाद
२. सोमवारी गाभाऱ्याबाहेर आणि अन्य दिवशी गाभाऱ्याच्या आत पिंडीला अभिषेक करण्याची सोय
३. भाविकांसाठी भक्तनिवासात राहण्याची सोय
४. शेवटच्या श्रावणी सोमवारी परिसरातील सर्व भजनी मंडळांचा दिवसभर भजन-कीर्तनाचा कार्यक्रम
भाविकांच्या सुरक्षिततेसाठी सोळा सिसिटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. ट्रस्टकडून विहिरीला कूंपन करून घेतले असून दर्शन रांगेत सुसूत्रता यावी व चोऱ्या होऊ नयेत म्हणून दर्शनबारी ओवरीच्या बाहेर आणली आहे. महिनाभर चोख बंदोबस्त ठेवला जाणार आहे.
- सचिन काळे, सहायक पोलिस निरीक्षक
गर्दी टाळण्यासाठी स्वतंत्र रांगा
देवस्थान समितीचे अध्यक्ष अनंत मोकाशी व सचिव विपुल भांडवलकर म्हणाले की, गर्दी टाळण्यासाठी मंदिरापासून काही अंतरावर पार्किंगची सोय केली आहे. गर्दी टाळण्यासाठी पेढे, स्टेशनरी, हॉटेल, पाळणे या दुकानांच्या रांगा एकमेकांपासून दूर आणि स्वतंत्र असणार आहेत. बससुविधेसाठी विविध आगारांना पत्रव्यवहार केला आहे.
मदतीसाठी संपर्क
करंजेपूल पोलिस दूरक्षेत्र - (०२११२) २८२१३३
होळ आरोग्य केंद्र रुग्णवाहिका - ९९२१४११९७८
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.