मुरूममध्ये दोन घरफोडीत दुचाकीसह ऐवज चोरला

मुरूममध्ये दोन घरफोडीत दुचाकीसह ऐवज चोरला
Published on

सोमेश्वरनगर, ता. २९ : मुरूम (ता. बारामती) येथे मंगळवारी (ता. २९) पहाटे चोरट्यांनी बंद असलेली दोन घरे फोडली. या घटनांत रोख रक्कम, एक दुचाकी, साड्या, भांडी असा ऐवज चोरून नेला. याशिवाय गावातील आणखी एक दुचाकीही चोरी झाली आहे.
मुरूम गावातील तळवणीनगर येथे चोरट्यांनी बाळू श्रीरंग गायकवाड यांचे बंद घर फोडले. घरातून सात हजार रोकड, तांब्याचा हंडा चोरून नेला. त्यांच्या घरासमोर उभी केलेली अमोल विलास गायकवाड यांची दुचाकी (एमएच ४१ एडब्ल्यू ७८९५) लॉक तोडून चोरून नेली. शेजारील संतोष बबन सोनवणे यांच्याही बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला मात्र तिथे त्यांच्या केवळ साड्या हाती लागल्या. याशिवाय, घरासमोरील दुचाकीचे लॉक तोडता न आल्याने ती वाचली. यानंतर गावातील पृथ्वीराज दीपक चव्हाण यांच्या घरासमोरील दुचाकी (एमएच ४२ बीए ६४२८) हीदेखील चोरट्यांनी चोरुन नेली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असून गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, बाळू गायकवाड यांच्या बंद घरी विलास गायकवाड रोज झोपण्यास असतात. मात्र, विलास गायकवाड उपचारासाठी बाहेरगावी गेले आणि घर फोडले गेले. संतोष सोनवणे यांचे कुटुंबही परगावी राहत असल्याने घर बंद होते. चोरट्यांनी रेकी करूनच घरफोड्या केल्या असाव्यात, असे अमोल गायकवाड यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com