राजकीय विकास तर शिक्षण मागास

राजकीय विकास तर शिक्षण मागास

Published on

संतोष शेंडकर : सकाळ वृत्तसेवा
सोमेश्वरनगर, ता. ४ : पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील २५ टक्के प्राथमिक शाळांना तर आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत तब्बल ३६ टक्के विद्यालयांना भोपळा फोडता आला नाही. पाचवी शिष्यवृत्ती १७५३ शाळांपैकी ४३९ शाळांचा तर आठवी शिष्यवृत्तीत १०४२ पैकी ३८२ शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे. शिष्यवृत्तिधारकच काय पण एकही विद्यार्थी पात्र (उत्तीर्ण) करू न शकलेल्या या शाळांना सुधारणा करावी लागणार आहे. काही तालुक्यांनी केवळ ‘भौतिक’ आणि ‘राजकीय’ विकासावर लक्ष केंद्रित केल्याने किंवा अनास्थेमुळे ते ‘शिक्षण’ विषयात मागास ठरले आहेत.

शिष्यवृत्ती परीक्षेत भाषा व गणित आणि इंग्रजी व बुद्धिमत्ता हे दोन पेपर प्रत्येकी दीडशे गुणांचे असतात. प्रत्येक पेपरमध्ये किमान साठ गुण उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक आहेत. यामध्ये शिरूरसारख्या तालुक्यांनी विकासात ‘शिक्षण’ या विषयाला प्राधान्य दिल्याने चळवळ निर्माण होऊन गुणवत्तेची परंपरा निर्माण झाली आहे
पाचवी शिष्यवृत्तीत दौंडच्या तब्बल ४३ टक्के, जुन्नरच्या ४२ टक्के, मुळशीच्या ३८ टक्के शाळांचा निकाल शून्य टक्के आहे. हेच प्रमाण बारामती, हवेली, इंदापूरमध्ये २८ ते ३० टक्के आहे. दुसरीकडे भोर (७ टक्के), शिरूर (११ टक्के), खेड (१४ टक्के), मावळ (१७ टक्के) या तालुक्यांत शून्य टक्क्यांच्या अत्यंत मोजक्या आहेत. आंबेगावमध्येही २५ टक्के भोपळे आहेत.

आठवी शिष्यवृत्तीत राजगडच्या ७५ टक्के, भोरच्या ६२ टक्के तर जुन्नर व दौंडच्या ४८ टक्के शाळा शून्य टक्क्यांच्या मानकरी ठरल्या आहेत. पुरंदर व मुळशी (४३ टक्के), हवेली (३६ टक्के), इंदापूर (३७ टक्के), मावळ व आंबेगाव (३५ टक्के), बारामती (३३ टक्के) या तालुक्यांचे आकडेही अजिबात समाधानकारक नाहीत.

भोर, राजगडमध्ये निकाल वाढविण्यावर भर
पाचवी शिष्यवृत्तीत शिरूरच्या फक्त ११ टक्के तर आठवी शिष्यवृत्तीत १२ टक्के शाळा शून्य टक्के निकालाच्या आहेत. पाचवी शिष्यवृत्तीत भोर व राजगड तालुक्यांनी निकाल वाढविण्यावर दिलेला भर कौतुकास्पद आहे. तिथे शंभर टक्के निकाल देणाऱ्या शाळा भरपूर आहेत. आठवी शिष्यवृत्तीत मात्र भोर-राजगडचे फासे उलटे पडले आहेत.

पाचवी शिष्यवृत्ती निकाल
तालुका शाळा शून्य टक्के शंभर टक्के
जुन्नर १६० ६८ ५
दौंड १४९ ६५ ०
हवेली १६६ ५० १
इंदापूर १२७ ३८ ०
बारामती १३० ३७ ३
मुळशी ९२ ३५ ४
खेड २३४ ३५ २
मावळ १६३ २८ ६
पुरंदर १०२ २९ ५
राजगड ६६ २४ १५
आंबेगाव ९० २३ १
शिरूर १५३ १८ २
भोर १२१ ९ १९


आठवी शिष्यवृत्ती निकाल
तालुका शाळा शून्य टक्के शंभर टक्के
जुन्नर ९६ ४७ ०
दौंड ९० ४४ १
हवेली १२० ४४ ५
इंदापूर ९६ ३६ १
भोर ५३ ३३ ०
खेड १०९ ३१ २
मावळ ८८ ३१ ५
बारामती ९३ ३१ १
पुरंदर ६९ ३० ०
मुळशी ६० २६ ३
आंबेगाव ५९ २१ २
शिरूर ९७ १२ ४
राजगड १२ ९ १

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com