कोयाळी, गोखळीचा शिष्यवृत्तीत भीमपराक्रम

कोयाळी, गोखळीचा शिष्यवृत्तीत भीमपराक्रम

Published on

सोमेश्वरनगर, ता. ५ : जिल्ह्यात विद्यार्थ्यांसाठी रात्रंदिवस कष्टणारे सरकारी शिक्षक-शिक्षिकाही अनेक आहेत. त्यामुळेच किमान दहापेक्षा अधिक शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी घडविणाऱ्या ‘पाचवी’ शिष्यवृत्तीत एकोणिस शाळा तर ‘आठवी’ शिष्यवृत्तीत एकवीस शाळा आहेत. पाचवी शिष्यवृत्तीत कोयाळी पुनर्वसन जिल्हा परिषद शाळेने ८२ तर आठवी शिष्यवृत्तीत गोखळीच्या गुरुकुल विद्यामंदिरने ६६ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आणण्याचा भीमपराक्रम केला आहे.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाचवी शिष्यवृत्तीत दहापेक्षा अधिक विद्यार्थी घडविणाऱ्या शिरूरच्या नऊ, खेडच्या पाच, आंबेगावच्या दोन तर इंदापूरची, हवेली व जुन्नरची प्रत्येकी एक शाळा आहे तर आठवी शिष्यवृत्तीत शिरूरच्या आठ, आंबेगावच्या पाच, खेडच्या-जुन्नरच्या प्रत्येकी तीन तर इंदापूर-बारामतीची प्रत्येकी एक शाळा आहे. गुरुकुल विद्यामंदिरने इंदापूरचा, एमईएस विद्यालयाने बारामतीचा तर लोणीकंद जिल्हा परिषद शाळेने हवेलीचा आब कसाबसा राखला आहे. पण पुरंदर, मावळ, मुळशी, राजगड, भोर, दौंड या तालुक्यात एकही शाळा दहा गुणवत्ताधारक घडवू शकली नाही.

कोयाळी पुनर्वसन, वाबळेवाडी, पिंपळगाव-महाळुंगे, ठिगळस्थळ, शिक्रापूर या जिल्हा परिषद शाळांच्या गुरुजींनी गौरवशाली परंपरा वाढवत चालविली आहे. इंदापूरचे गुरुकुल विद्यामंदिर, शिरूरची विद्याधाम प्रशाला, राजगुरुनगरचे महात्मा गांधी विद्यालय यांनी तर पाचवी आणि आठवीतही गुणवत्ताधारक घडवत दुहेरी यश मिळविले आहे.

आठवीच्या टॉप टेन शाळा
शाळेचे नाव...............तालुका...............शिष्यवृत्तीधारक
गुरुकुल विद्यामंदीर, गोखळी...............इंदापूर...............६६
पलांडे हायस्कूल, मुखई...............शिरूर...............३८
डावखरे विद्यालय, पिंपळे-खालसा...............शिरूर...............३४
म. गांधी विद्यालय, राजगुरुनगर...............खेड...............३४
जि. प., धानोरे...............खेड...............३२
जि. प., वाबळेवाडी...............शिरूर...............३१
विद्याधाम प्रशाला, शिरूर...............शिरूर...............३०
जि. प., वसेवाडी...............शिरूर...............२१
विद्या विकास विद्यालय, अवसरी...............आंबेगाव...............२७
निवृत्तीशेठ डागी विद्यालय, पवळे...............आंबेगाव...............१८
इंग्लिश स्कूल, नारायणगाव...............जुन्नर...............१८
अजिंक्यतारा स्कूल, शिक्रापूर...............शिरूर...............१८

अन्य दहापेक्षा अधिक शिष्यवृत्तीधारक शाळा
सणसवाडी माध्यमिक विद्यालय, विद्याधाम विद्यालय कान्हूरमेसाई, एमईएस विद्यालय बारामती, चैतन्य विद्यालय ओतूर, सबनीस विद्यालय नारायणगाव, महात्मा गांधी विद्यालय मंचर, हुतात्मा बाबू गेनू विद्यालय, न्यू इंग्लिश स्कूल, घोडेगाव, नवमहाराष्ट्र विद्यालय, खराबवाडी


पाचवी शिष्यवृत्तीतील टॉप टेन शाळा
शाळा...............तालुका...............शिष्यवृत्तीधारक
जि.प., कोयाळी पुनर्वसन...............शिरूर...............८२
जि.प., वाबळेवाडी...............शिरूर...............३२
जि.प., ठिगळस्थळ...............खेड...............३१
विद्याधाम प्रशाला, शिरूर...............शिरूर...............३१
जि.प., पिंपळगाव-महाळुंगे...............आंबेगाव...............२९
गुरुकुल, गोखळी...............इंदापूर...............२७
जि.प., पिंपळे खालसा...............शिरूर...............२२
जि. प., धानोरे...............खेड...............२२
जि. प., शिक्रापूर...............शिरूर...............१९
जि.प., खैरेनगर...............शिरूर...............१७

अन्य दहापेक्षा अधिक शिष्यवृत्तीधारक शाळा
जि.प. वसेवाडी, जि. प. साकोरेमळा, जि. प.सातकरवस्ती, जि. प.टाकळकरवाडी, जि.प. तळेगाव ढमढेरे, जि. प. लोणीकंद, महात्मा विद्यालय राजगुरुनगर, जि.प.जातेगाव बु., सदगुरू विद्यालय पेंढार

---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com