वाणेवाडीच्या ग्रामसचिवालयासाठी गायरान जमीन

वाणेवाडीच्या ग्रामसचिवालयासाठी गायरान जमीन

Published on

सोमेश्वरनगर, ता. २८ ः वाणेवाडी (ता. बारामती) गावासाठी ग्रामसचिवालय उभारण्यासाठी हव्या असलेल्या जागेचा प्रलंबित प्रश्न अखेर सुटला. राज्य सरकारच्या महसूल विभागाने गावातील गायरान जमिनीपैकी पंधरा गुंठे जागा ग्रामपंचायतीला हस्तांतर करण्यास मंजुरी दिली.
बारामती तालुक्यातील वाणेवाडी हे मोठे गाव परंतु ग्रामसचिवालय बांधण्यासाठी गावाकडे जागा उपलब्ध नव्हती. यासाठी वाणेवाडी ग्रामपंचायतीने जुलै महिन्यात बारामती पंचायत समिती व पुणे जिल्हा परिषदेमार्फत महसूल विभागाला गायरान जमीन उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्ताव दिला होता.
अखेर, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मदतीमुळे वाणेवाडीस पंधरा गुंठे गायरान जमीन उपलब्ध झाली आहे. वाणेवाडीतील गायरान गट क्रमांक ८० मधून ही जागा महसूलमुक्त व भोगवटामूल्यमुक्त पद्धतीने मिळणार आहे. तीन वर्षांच्या आत जागावापर करण्याचे आणि अन्य कुठल्याही कारणासाठी जागा न वापरण्याचे आदेश महसूल विभागाने दिले आहेत, अशी माहिती सरपंच गीतांजली जगताप व ग्रामसेवक विजय चव्हाण यांनी दिली.

अजित दादा, बावनकुळे साहेब यांनी हा निर्णय तातडीने घेऊन आमचा खूप वर्षांचा प्रलंबित प्रश्न सोडविल्याबद्दल त्यांचे आभार. गटविकास अधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, प्रांताधिकारी, वनविभाग यांनीही कागदपत्रांची पूर्तता करण्यास मदत केली. इमारतीसाठी तीस लाखांचा निधी उपलब्ध झालेला आहे. आणखी निधी मिळवून इमारतीचे प्रलंबित काम लवकर मार्गी लागेल.
- गीतांजली जगताप, सरपंच, वाणेवाडी.

महसूलमंत्र्यांची पोस्ट
‘गायरान जमीन ग्रामपंचायत इमारतीसाठी देण्याच्या निर्णयामुळे वाणेवाडी ग्रामस्थांची प्रलंबित मागणी पूर्ण झाली असून, स्थानिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे,’ अशा आशयाची पोस्ट खुद्द महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी समाजमाध्यमांमध्ये लिहली आहे. या पोस्टचा स्क्रीनशॉट परिसरातील समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com