शेळ्या, बोकड चोरणारे सदोबाचीवाडीत पकडले
सोमेश्वरनगर, ता. ५ : सदोबाचीवाडी (ता. बारामती) येथील इनामवस्तीवरील संजय जगन्नाथ होळकर या शेतकऱ्याचे चार बोकड आणि एक शेळी चोरट्यांनी लंपास केली होती. याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे तिघांना पकडले. अजय सतीश होळकर (रा. होळ), आर्यन सचिन माने (रा. सदोबाचीवाडी), बंटी नंदकुमार घोडके (रा. वडगाव निंबाळकर), अशी आरोपींची नावे आहेत. तिघांनाही सोमवारी बारामती न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली असून, त्यांच्याकडून आणखी तपास करत आहोत, अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील यांनी दिली.
आरोपींनी संजय होळकर यांच्या गुरांच्या गोठ्यात शिरून लोखंडी जाळी तोडून चार बोकड आणि एक शेळी दोन दुचाकी वापरून चोरी केल्या होत्या. पोलिसांनी गोपनीय माहिती आणि सीसीटीव्हीच्या माहितीचे विश्लेषण करून सदर आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चारही बोकड व एक शेळी हस्तगत केली. तसेच चोरीसाठी वापरलेल्या दोन्ही दुचाकी जप्त केल्या आहेत. पोलीस हवालदार पोपट नाळे अधिक तपास करत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोपट नाळे, सागर चौधरी, हृदयनाथ देवकर, महेश पन्हाळे, भाऊसाहेब मारकड, आबा जाधव, सूरज धोत्रे, विलास ओमासे या पथकाने ही कामगिरी केली.
वाघळवाडी येथूनही रविवारी पहाटेच्या दरम्यान एक पिकअप घेऊन आलेल्या तीन- चार चोरट्यांनी कांताबापू गायकवाड यांच्या गोठ्यातील चार शेळ्या चोरून नेण्याचा प्रयत्न केला. शेळ्यांच्या आवाजाने शेतकरी जागा झाला. तोपर्यंत चोरट्यांनी तीन शेळ्या गायब केल्या, मात्र एक शेळी बचावली. याबाबतही माहितीचे विश्लेषण केले असून तपास अंतिम टप्प्यात असल्याचे, नागनाथ पाटील यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

