खंडोबाचीवाडी ग्रामस्थांचा खडी क्रशरला विरोध
सोमेश्वरनगर, ता. ७ ः खंडोबाचीवाडी (ता. बारामती) ग्रामस्थांनी एकजूट दाखवत ग्रामसभेत संभाव्य दगडखाण व खडी क्रशरला तीव्र विरोध केला आहे. यावेळी ग्रामस्थांनी आपल्या गावाच्या हद्दीत भविष्यातही कोणत्याही प्रकारचा खडी क्रशर उभारणी अथवा दारू विक्री करण्यास कायमस्वरूपी मनाई करण्याचा ठराव एकमताने घेतला आहे.
वाघळवाडी (ता. बारामती) येथील समर्थ ज्ञानपीठाचे अध्यक्ष अजिंक्य सावंत व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी १० डिसेंबरला खंडोबाचीवाडी ग्रामपंचायतीस अर्ज केला होता. खंडोबाचीवाडी हद्दीतील स्वमालकीच्या जमिनीवर दगडखाण व खडी क्रशर टाकण्यासाठी ना हरकत मिळावी, गावाला कुठलाही त्रास होणार नाही, असे नमूद केले होते. या अर्जानंतर ग्रामपंचायत हद्दीतील घुमटवस्ती, कन्हेरवाडी व खंडोबाचीवाडी गावठाण येथील सत्तर ७० ग्रामस्थांनी खडी क्रशरच्या विरोधातील अर्ज ग्रामपंचायतीला दिला. खाण व क्रशरमुळे ध्वनी व वायू प्रदूषण यामुळे नागरिक व जनावरांना त्रास होतील आणि धुळीने शेतीव्यवस्था आणि वनविभागातील वृक्षराजीवर प्रतिकूल परिणाम होईल, अशी भीती व्यक्त केली. त्यामुळे मंगळवारी (ता. ६) सरपंच संतोष धायगुडे यांच्या अध्यक्षतेखाली विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात विशेष ग्रामसभेचे आयोजन केले होते. यावेळी ग्रामसेविका सीमा गावडे यांनी अहवालवाचन केले. यामध्ये सावंत यांचा मागणी मांडण्यात आला. ज्या गटात खडी क्रशर होणार आहे, त्या गटातील शेतकऱ्यांनीही यासविरोध केला आणि डॉ. वसंत दगडे यांनी त्या ठिकाणी हॉस्पिटल उभारण्याचा अर्ज दिला. सर्व गोष्टींचा ऊहापोह झाल्यानंतर ग्रामस्थांनी एकमताने खडी क्रशरला ‘ना हरकत देऊ नये’, असा ठराव घेतला. सोमेश्वर कारखान्याचे संचालक लक्ष्मण गोफणे सूचक, तर दुसरे संचालक शैलेश रासकर हे अनुमोदक आहेत.
दारूविक्रीलाही बंदी
खंडोबाचीवाडी गावाच्या हद्दीत भविष्यात कोणत्याही प्रकारचा खडी क्रशर, बिअर बार, मद्यविक्री, रासायनिक कारखाने, कला केंद्र यास कायमस्वरूपी बंदी घालण्याचा दूरगामी निर्णय २००पेक्षा अधिक लोकांनी एकमताने घेतला आहे. तो भविष्यातील कार्यकारिणीसह बंधनकारक राहणार आहे, अशी माहिती सरपंच संतोष धायगुडे यांनी दिली. तसेच, सावंत कुटुंबीयांना ठरावाबाबत कळविले असल्याचेही सांगितले.
05235
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

