नीरा-मोरगाव रस्त्यावर स्पर्धेचे यशस्वी नियोजन

नीरा-मोरगाव रस्त्यावर स्पर्धेचे यशस्वी नियोजन

Published on

सोमेश्वरनगर, ता. २२ : पुणे ग्रँड टूर चॅलेंज सायकल स्पर्धेतील स्पर्धकांचे नीरा-मोरगाव रस्त्यावर ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले. ‘भारत माता की जय’ अशा घोषणा देत आणि टाळ्या वाजवत स्पर्धकांचा उत्साह वाढविण्यात आला. वडगाव निंबाळकर पोलिसांनी परिसरातील विविध संस्थांकडून लोकसहभाग घेत स्पर्धेचे यशस्वी नियोजन केले.

सायकल स्पर्धेनिमित्त सकाळपासूनच परिसरात उत्साही वातावरण होते. दुपारी एक पासूनच नीरा-मोरगाव या २२ किलोमीटर रस्त्यावर ठिकठिकाणी प्राथमिक, माध्यमिक शाळेची मुले व नागरिक सायकल स्पर्धकांच्या स्वागतासाठी उपस्थित झाले होते. प्रत्येक पन्नास-शंभर फुटावर पोलिस बंदोबस्तासाठी तैनात होते. नीरा सोडल्यानंतर कोळीवस्ती, गुळुंचे, ब्राह्मणदरा, चौधरवाडी, मोढवे अशा ठिकठिकाणी रस्त्याकडेने लोकांनी उत्स्फूर्त गर्दी केली होती. चौधरवाडी येथील छोट्या घाटात चौकात अत्यंत जल्लोषात सायकल स्पर्धकांचे स्वागत झाले. स्पर्धकांना कुठलाही अडथळा येऊन न देता घोषणा देण्यात आल्या. पापण्या लवते न लवते तोच वेगाने पुढे जात असलेले स्पर्धक पाहून हे दृश्य डोळ्यात साठवत होते.
वडगाव निंबाळकर पोलिस पथकाने जुबिलन्ट इनग्रीव्हियाचे साठ कामगार, पोलिस पाटील, आजी माजी सैनिक संघटना तसेच शरदचंद्र पवार कॉलेज आणि मु. सा. काकडे कॉलेज यांच्या एनएसएस विभागाचे विद्यार्थी यांची संयोजनासाठी मदत घेतली.
सहाय्यक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील म्हणाले की, लोकांच्या सहभागामुळे आणि शाळा महाविद्यालयांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे स्पर्धा अत्यंत सुरळीत व यशस्वी पार पडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com