करंजेपूलच्या हवालदारावर
लाचप्रकरणी गुन्हा दाखल

करंजेपूलच्या हवालदारावर लाचप्रकरणी गुन्हा दाखल

Published on

सोमेश्वरनगर, ता. ३१ : वडगाव निंबाळकर (ता. बारामती) पोलिस ठाण्याअंतर्गत करंजेपूल दूरक्षेत्राचे हवालदार रमेश नागटिळक यांनी स्वतःसाठी व पोलिस उपनिरीक्षक राहुल साबळे यांच्यासाठी एका गुन्ह्यात २५ हजारांची लाच मागितली असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. याप्रकरणी नागटिळक याच्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात काही दिवसांपूर्वी एकावर गंभीर गुन्हा दाखल केलेला आहे. संबंधित गुन्ह्याचा तपास करंजेपूल दूरक्षेत्राचे पोलिस उपनिरीक्षक राहुल साबळे करत होते, तर आरोपी पोलिस हवालदार नागटिळक तपास अधिकाऱ्यास मदतनीस होता. दरम्यान, वरील गुन्ह्यातील आरोपीच्या नातेवाईक महिलेने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे पुढील तक्रार केली होती. महिलेच्या गुन्हा दाखल असलेल्या मुलास जामिनासाठी मिळावा व गुन्ह्याचे आरोपपत्र लवकरात लवकर दाखल व्हावे, यासाठी नागटिळक व साबळे हे दोघे तीस हजार रुपये लाचेची मागणी करत आहेत, असे तक्रारीत म्हटले होते. महिलेने १८ जानेवारीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तशी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची पडताळणी करण्यात आली. यामध्ये नागटिळक याने गुन्हेगारास मदत करण्याच्या बदल्यात स्वतःसाठी व साबळे यांच्यासाठी पंचवीस हजार रुपयाची लाच मागितली असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी नागटिळक यास ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सापळा अधिकारी म्हणून पोलिस निरीक्षक असावरी शेडगे यांनी कामगिरी बजावली, तर अधिक तपास पोलिस निरीक्षक अविनाश घरबुडे करत आहेत.
पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त पोलिस अधिक्षक अजित पाटील व अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली, अशी माहिती सहायक पोलिस आयुक्त दयानंद गावडे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com