‘सोमेश्‍वर’ अजितदादांचा पुतळा उभारणार

‘सोमेश्‍वर’ अजितदादांचा पुतळा उभारणार

Published on

सोमेश्वरनगर, ता. ४ : ‘‘सन १९९२च्या सत्तांतरापासून आजपर्यंत सोमेश्वर कारखान्याचा कायापालट अजितदादा पवार यांच्यामुळे झाला आहे. सतत उच्चांकी दर देऊन सभासदांच्या जीवनमानात प्रगती घडवून आणली आहे. अडीच हजार टनाचा कारखाना दहा हजार टनी झाला असून, उपपदार्थनिर्मिती प्रकल्प, शिक्षण संस्था राज्यात उत्कृष्ट आहेत. म्हणूनच त्यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून अजितदादांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा संचालक मंडळाचा‘‘ मानस आहे,’’ अशी माहिती ‘सोमेश्वर’चे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.
जगताप म्हणाले, सोमेश्वर कारखान्यात सन १९९२मध्ये अजितदादांनी दिवसरात्र राबून स्थानिक सहकाऱ्यांची बेरीज करत तीस वर्षांनी सत्तांतर घडवले. त्यानंतर देशाचे नेते शरद पवार यांच्या मदतीने ‘सोमेश्वर’ला उद्योगसमूह बनवले. सोमेश्वर शिक्षण मंडळाची चार ठिकाणी नवी विद्यालये सुसज्ज इमारतीसह सुरू केली. इंजिनिअरिंग, डिप्लोमा, बीएस्सी-एमएस्सी, एमबीए, बीसीएस असे शिक्षणसंकुल उभारले. शिक्षण संस्थेस पवार चॅरिटेबल ट्रस्टकडून कोट्यवधींची मदत केली. आज सभासदांच्या घराघरांत व्यावसायिक पदवीधर आहेत. आर्थिक व तांत्रिक व्यवस्थापनावर, नोकरभरतीवर अंकुश ठेवला. काटकसरीतून राज्यात सर्वोच्च दर देण्याची प्रथाच पाडली याने शेतकऱ्याची सर्वंकष प्रगती झाली. त्यांच्या कामांची पिढ्यानपिढ्या आठवण राहावी यासाठी पुतळा उभारत आहोत.’’
अजितदादांनी सोमेश्वरनगर परिसरात भव्य क्रीडा संकुलासाठी सव्वा कोटी शासननिधी दिलाय. ते अधिक भव्य व्हावे, यासाठी त्यांनी प्लॅन बदलायला लावून स्वतः सीएसआरमधून एक कोटींची तजवीज काही दिवसांपूर्वीच केली. आणखी लागले तरी मिळण्याचा मार्ग सुकर केला आहे. त्यामुळे त्याचेही ‘लोकनेते अजितदादा पवार क्रीडा संकुल’ असे नामकरण करणार असल्याचे पुरुषोत्तम जगताप यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com