काकडे महाविद्यालयात ३५०० पदांचा महारोजगार मेळावा
सोमेश्वरनगर, ता. २४ : महाराष्ट्र राज्याचा ‘कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभाग’ आणि मु. सा. काकडे महाविद्यालय यांच्या वतीने ‘३५०० पदांचा महारोजगार मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवारी (ता. २७) सकाळी दहापासूनच महाविद्यालयाच्या आर. एन. शिंदे सभागृहात या इच्छुक उमेदवारांच्या थेट मुलाखती होणार आहेत.
सोमेश्वरनगरमधील काकडे महाविद्यालयात आयोजित केलेल्या पंडित दिनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्यात दहावी, बारावी, पदवीधर, आयटीआय, डिप्लोमा यासह विविध तांत्रिक पात्रता असलेल्या उमेदवारांना सहभागी होता येणार आहे. ग्रामीण भागातील तरुण-तरुणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि कंपन्यांना ग्रामीण भागातील कार्यक्षम कामगार-अधिकारी मिळावेत यासाठी मेळाव्याचे आयोजन केल्याचे, महाविद्यालयाचे अध्यक्ष सतीश काकडे यांनी सांगितले. इच्छुक उमेदवारांनी आपला बायोडाटा, शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रती व आवश्यक प्रमाणपत्रांसह थेट मेळाव्यात येऊन मुलाखती द्याव्यात, असे आवाहन प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

