''सोमेश्वर''चे ११ लाख टन गाळप पूर्ण

''सोमेश्वर''चे ११ लाख टन गाळप पूर्ण

Published on

सोमेश्वरनगर, ता. २६ : ऊस टंचाईच्या काळातही येथील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने गाळपाचा अकरा लाख टनांचा महत्त्वपूर्ण टप्पा ओलांडला आहे. कारखान्याने जिल्ह्यात ११.७४ टक्के इतका सर्वाधिक उतारा प्राप्त करत १२ लाख ९४ हजार क्विंटल साखरनिर्मिती केली आहे. कारखान्याकडून मार्चच्या शेवटच्या आठवड्यात संपूर्ण गाळप उरणार आहे, अशी माहिती सोमेश्वरचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप व कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी दिली.
सोमेश्वरने गुरुवारपर्यंत ११७ दिवसात दैनंदिन साडेनऊ हजार टन प्रतिदिन अशा उच्चांकी क्षमतेने ११ लाख ७ हजार टन गाळप केले आहे. दैनंदिन साखर उतारा तब्बल १३ टक्के आहे. त्यामुळे अंतिम सरासरी उतारा १२ टक्क्यांच्या पुढेच असणार आहे. सोमेश्वरच्या संचालक मंडळाने हंगामाच्या सुरवातीलाच साडेतेरा ते चौदा लाख टन गाळपाचा मनोदय व्यक्त केला होता. अपवाद वगळता सभासदांनी अन्य कारखान्यांना ऊस न दिल्याने कारखाना मार्चच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत चालेल आणि साडेतेरा लाख टन गाळप पूर्ण होईल असा अंदाज आहे. उपाध्यक्ष मिलिंद कांबळे म्हणाले, सध्याच्या गाळपात सोमेश्वर जिल्ह्यात तिसरा तर राज्यात आठवा आहे. तसेच साखर उताऱ्यात सोमेश्वर जिल्ह्यात प्रथम आहे.

१ मार्चपासून ३५०० रुपये उचल
सोमेश्वरने पहिली उचल एकरकमी ३३०० रूपये प्रतिटन दिली आहे. मात्र फेब्रुवारी व मार्चमध्ये उशिरा तुटणाऱ्या उसाला अधिकचे प्रोत्साहन अनुदान देत आहोत. त्यामुळे १ फेब्रुवारीपासून तुटणाऱ्या उसाला ३४०० रुपये उचल अदा केली आहे. तर १ मार्चपासून तुटणाऱ्या उसाला ३५०० रुपये प्रतिटन एकरकमी उचल देणार आहोत, अशी माहिती पुरूषोत्तम जगताप यांनी दिली.


केंद्रसरकारने दिलेल्या ८३ हजार ५०० क्विंटलच्या कोट्यापैकी सोमेश्वरने ६७ हजार क्विंटल साखर दोन टप्प्यात निर्यात केली आहे. साध्या साखरेला ३७७० तर मोठ्या साखरेला ३८५० रूपये प्रतिक्विंटल असा चांगला दर मिळाला. त्याचा सभासदांना अंतिम दर देताना उपयोग होणार आहे. तसेच उरलेला १६ हजार ५०० क्विंटल कोटा आणि नव्याने मिळणार असलेला कोटा जागतिक बाजार पाहून निर्यात केला जाणार आहे, अशी माहिती राजेंद्र यादव यांनी दिली.


वीजनिर्मिती : ९ कोटी ५० लाख युनिट
वीजनिर्यात: ६ कोटी २० लाख युनिट
बी हेवी मोलासेसनिर्मिती: १६ हजार ५०० टन
अल्कोहोलनिर्मिती : ५६ लाख ५५ हजार लि.
इथेनॉलनिर्मिती : ३२ लाख ८४ हजार लि.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com