क्रीडा गुण सवलतीचे प्रस्ताव १५ एप्रिलपर्यंत सादर करा
सोमेश्वरनगर, ता. ३ ः दहावी- बारावीच्या परीक्षेस प्रविष्ट झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांचे क्रीडा गुण सवलतीचे प्रस्ताव १५ एप्रिलपर्यंत ऑनलाइन पद्धतीने सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने क्रीडा विभागाला पत्राद्वारे विनंती केली आहे. त्यानुसार क्रीडा विभागाने खेळाडूंची, स्पर्धांची अधिकृतता तपासणे आणि छाननी करणे यासाठी ऑनलाइन पद्धतीचे प्रस्ताव मागवले आहेत. शालेय क्रीडा स्पर्धा किंवा अधिकृत शासनाशी संलग्न संघटनेकडून घेतलेल्या स्पर्धांमध्ये जिल्हा, विभाग, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर प्रथम तीन क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांना सवलत गुण दिले जातात.
जगन्नाथ लकडे म्हणाले, ‘‘मागील वर्षांप्रमाणे यावर्षीही निकाल लवकर जाहीर करण्याच्या दृष्टीने क्रीडा गुण सवलतीचे प्रस्ताव राज्य शासनाच्या आपले सरकार पोर्टल या संकेतस्थळावर (https://aaplesarkar.mahaonline.gov.in) लिंकद्वारे १५ एप्रिल पर्यंत पाठवावेत. त्याची ऑनलाइनच शाहनिशा करून ते बोर्डाकडे पाठवले जातील. विद्यार्थी, शिक्षक, शाळांनी काळजीपूर्वक प्रस्ताव पाठवावेत. याबाबतची कार्यपद्धती संकेतस्थळावरील यूजर मॅन्युअलमध्ये नमूद केली आहे. विद्यार्थ्यांचा किंवा पालकांचा नेहमी उपयोगात असलेलाच मोबाईल नंबर प्रस्तावात असावा. त्रुटींबाबत काही मेसेज पडतो का? यावरही लक्ष ठेवावे. त्रुटींची पूर्तताही तातडीने करावी. मुदतीनंतर अथवा ऑफलाइन पद्दतीने कोणतेही प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत.’’
तांत्रिक अडचणीसाठी टोल फ्री क्रमांक - १८००१२०८०४० व इतर अडचणींसाठी - अश्विनी हत्तरगे (७३८७८८०४२७), दादासाहेब देवकाते (९९२३९०२७७७), शिवाजी कोळी (७०२०३३०४८८), ज्योती सूर्यवंशी (७७९८३०२४८१) यांच्याशी संपर्क साधावा, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने आवाहन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

