बेलसर-निळुंज सोसायटीच्या अध्यक्षपदी हनुमंत जगताप

बेलसर-निळुंज सोसायटीच्या 
अध्यक्षपदी हनुमंत जगताप
Published on

सोमेश्वरनगर, ता. २ ः बेलसर येथील बेलसर-निळुंज विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी हनुमंत जगताप यांची तर उपाध्यक्षपदी अर्जुन गरुड यांची बिनविरोध निवड झाली. दीड हजार शेतकरी सभासद असलेल्या व दरवर्षी पंधरा टक्के लाभांश देणाऱ्या या सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. सचिन भोईटे व रामदास जगताप यांनी राजीनामा दिल्याने रिक्त पदासाठी पुणे जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली निवड प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अमरीन बागवन यांनी काम पाहिले. सचिव हनिफ सय्यद यांनी सहकार्य केले. या वेळी मामा गरूड, संभाजी गरूड, धीरज जगताप, कैलास जगताप आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com