

संतोष शेंडकर : सकाळ वृत्तसेवा
सोमेश्वरनगर, ता. ४ : देशात चालू हंगामात साखर उत्पादनाचा अंदाज कमालीचा घसरला आहे. मार्चअखेर २७१ लाख टन साखरनिर्मिती झाली आहे. गतहंगामात साखर उत्पादनात पुढे गेलेल्या उत्तरप्रदेशाला महाराष्ट्राने चालू हंगामात पुन्हा मागे टाकले आहे. यंदा महाराष्ट्रात ९८ लाख टन तर उत्तर प्रदेशात ८७ लाख टन साखरनिर्मिती झाली आहे.
चालू साखर हंगामात देशातील ५४१ साखर कारखान्यांपैकी ४६७ बंद झाले आहेत. गतहंगामाच्या तुलनेत १८० लाख टन जास्त म्हणजे २८३५ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. गतहंगामाच्या (९.३७ टक्के) तुलनेत चालू हंगामात देशाचा उतारा वाढून ९.५६ टक्क्यांपर्यंत गेला आहे. चालू हंगामात देशाचा साखर उत्पादनाचा अंदाज ३५० लाख टनांहून ३१५ लाख टनांवर घसरला आहे. महाराष्ट्रात ११० लाख टन तर उत्तरप्रदेशात १०५ लाख टन साखरनिर्मिती होईल असा अंदाज होता.
दृष्टिक्षेपात
- महाराष्ट्रात आतापर्यंत ९८ लाख टन साखरनिर्मिती
- आठच कारखाने सुरू असल्याने १०० लाख टनांच्या आत कारभार गुंडाळणार
- उत्तरप्रदेशात ९५ लाख टनांपर्यंत साखरनिर्मिती होणार आहे.
- आता पुन्हा महाराष्ट्र देशात अव्वल ठरला
- जगाचा विचार करता महाराष्ट्र तिसरा किंवा चौथा असू शकतो.
उताऱ्यात उत्तर प्रदेशच आघाडीवर
साखरनिर्मितीत २०१६-१७ पासून २०२०-२१ पर्यंत उत्तरप्रदेश तर त्यानंतर गतहंगामाचा अपवाद वगळता महाराष्ट्र अव्वल ठरत आहे. चालू हंगामात उत्तरप्रदेशातील उसांवर किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आणि महाराष्ट्राच्या तुलनेत ऊस गाळपात मोठी घट झाली. उताऱ्यात मात्र उत्तरप्रदेशच अव्वल आहे.
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या आकडेवारीनुसार मार्चअखेर देशातील गाळप व साखरनिर्मिती (लाख टन) -
राज्य.........कारखाने.........चालू.........ऊसगाळप.........साखरनिर्मिती.........उतारा (%)
उत्तरप्रदेश.........१२१.........३८.........८५७.........८७.४५.........१०.२०
महाराष्ट्र.........२००.........८.........१०४१.........९८.९५.........९.५०
कर्नाटक.........८०.........१.........५४०.........४६.७५.........८.६५
गुजरात.........१५.........१.........७०.........७.४५.........१०.६०
तामिळनाडू.........३०.........१८.........५६.........५.०५.........८.९५
उत्तरप्रदेश व महाराष्ट्राचे दहा वर्षातील साखर उत्पादन (लाख टन)
हंगाम उत्तरप्रदेश महाराष्ट्र
२०१४-१५ ७१ १०५
२०१५-१६ ६८ ८२
२०१६-१७ ८७ ४२
२०१७-१८ १२० १०७
२०१८-१९ ११८ १०७
२०१९-२० १२६ ६१
२०२०-२१ ११० १०६
२०२१-२२ १०२ १३८
२०२२-२३ १०४ १०५
२०२३-२४ १०४ ११०
२०२४-२५ ९१.५० ८०.७०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.