कर्मयोगी, भीमा पाटस कारखान्यांवर ‘डोंगर’

कर्मयोगी, भीमा पाटस कारखान्यांवर ‘डोंगर’
Published on

संतोष शेंडकर : सकाळ वृत्तसेवा
सोमेश्वरनगर, ता. ९ : जिल्ह्यात मार्चअखेरीस सात कारखान्यांकडे शेतकऱ्यांच्या उसाच्या एसआरपीची १६१ कोटी रुपये इतकी थकबाकी आहे. कर्मयोगी आणि भीमा पाटस या भाडेतत्त्वावर चालवायला दिलेल्या कारखान्यांकडेच शेतकऱ्यांची देणी मोठ्या प्रमाणावर थकली आहेत. अन्य पाच कारखान्यांकडील शेतकऱ्यांची देणी थोड्या प्रमाणात आहेत. प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत असलेल्या छत्रपती आणि नीरा-भीमा कारखान्यांनी मात्र शंभर टक्के एफआरपी दिली आहे.


सरकारी अनास्थेमुळे साखरधंदा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून जात असल्याने सात कारखान्यांकडे थोडी-बहुत थकबाकी दिसून येत आहे. फेब्रुवारीत बंद झालेल्या पराग व दौंड शुगरची काही प्रमाणात देणी राहिली आहेत. माळेगाव, बारामती ॲग्रो व विघ्नहर या कारखान्यांचीही मार्चअखेरीस शेतकऱ्यांची मोठी देणी राहिलेली साखर आयुक्तालयाच्या अहवालात दिसत आहेत.
दरम्यान, जिल्ह्यात नेमके भाडेतत्त्वावर दिलेले कारखाने एफआरपीबाबत खूपच मागे आहेत. ओंकार ग्रुपने चालवायला घेतलेल्या कर्मयोगी कारखान्याने शेतकऱ्यांची तब्बल ७० कोटींची आणि साईप्रिया ग्रुपने चालवायला घेतलेल्या भीमा पाटसने २८ कोटींची देणी थकवल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले आहे.


या कारखान्यांकडूनही ऊसबिले अदा
छत्रपती, छत्रपती, सोमेश्वर, व्यंकटेश
भीमाशंकर, संत तुकाराम, श्रीनाथ

जिल्ह्याशेजारील कारखान्यांची एफआरपी अदा केल्याची टक्केवारी -
किसनवीर, भुईंज.........४६.१७
किसनवीर खंडाळा.........६१.७५
इंडिकॉन - १००
स्वराज - ७८
प्रतापगड - ७१
शरयू - १००
दत्त इंडिया - १००
गौरी शुगर- १००


दृष्टिक्षेपात यंदाचा हंगाम
११६ लाख टन .......उसाचे गाळप
११४ लाख टन..... साखरनिर्मिती

(साखर आयुक्तालयाच्या मार्चअखेरच्याअहवालानुसार)
कारखाना एफआरपी(रू.प्रतिटन) अदा एफआरपी(%) थकबाकी(लाख रू.)
सोमेश्वर ३२८५ १०० -
भीमाशंकर ३२७२ १०० -
संत तुकाराम २९०३ १०० -
छत्रपती २८२१ १०० -
नीरा भीमा २६७८ १०० -
व्यंकटेश ३०९१ १०० -
श्रीनाथ ३०५५ १०० -
अनुराज २३९० १०० -
दौंड शुगर ३०४७ ९८.८९ ५११
पराग ३१५७ ९८.१८ २५४
माळेगाव ३२६९ ९५.२६ १६८८
विघ्नहर ३१५१ ९५.२० १२७२
बारामती ॲग्रो २७८४ ९४.९० २४९३
कर्मयोगी २७५३ ६१ ७०२५
भीमापाटस ३०७८ ८५.६७ २८६८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com