

संतोष शेंडकर ः सकाळ वृत्तसेवा
सोमेश्वरनगर, ता. २० ः सध्या जिल्ह्यातील विविध ठिकाणचे तापमान ४० ते ४१ डिग्री सेल्सिअस इतके नोंदविले गेले. या पार्श्वभूमीवर उष्माघात टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी सकाळी आणि संध्याकाळी शेतातील कामे करण्याची गरज आहे. तसेच, पुरेसे पाणी पिणे आणि आहारात फळभाज्यांचा समावेश करणे गरजेचे आहे.
बारामती तालुक्यातील आघारकर कृषी संशोधन केंद्रावर सोमवारी (ता. २०) तब्बल ४१ डिग्री सेल्सिअस इतके तापमान नोंदविले गेले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना इतक्या जास्त तापमानाची सवय नसल्याने उष्माघात जिवावर बेतणारा ठरू शकतो. त्यामुळे शेतात राबणारे पुरुष आणि स्त्रियांनी काही काळ कामाच्या वेळा बदलून स्वतःला जपण्याची गरज आहे.
या समस्या उद्भवू शकतात
उष्माघात
उन्हाळी लागणे
चक्कर येणे
पोटदुखी
डोकेदुखी
घ्यावयाची काळजी
सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत काम करा
रात्रीच्या गारव्यात साप बाहेर पडतात, त्यामुळे रात्री गमबूट वापरा
अंगावर सुती व सैल कपडे वापरा
डोक्याला फेटा, टोपी, स्कार्फ, पदर असे संरक्षण असावे
डोळ्याला गॉगल किंवा चष्मा लावा
पाण्याची बाटली सोबत ठेवा
हलके व ताजे अन्न खा
टप्प्याटप्प्याने भरपूर पाणी प्या
उन्हाळ्यात घोट घोट अशा स्वरूपात टप्प्याटप्प्याने भरपूर पाणी प्यावे. एकदम पिणे किंवा फ्रीजमधील पाणी पिणे टाळावे. उष्ण, तेलकट, मसालेदार जेवण टाळावे. याउलट पाणी धरून ठेवणाऱ्या फळभाज्यांचा आहार वाढवावा. मांसाहार मर्यादित करावा आणि मांसाहार करून उन्हात जाणे, प्रवास करणे टाळावे. शेतातले खरबूज, कलिंगड, नारळ याचे सेवन करावे. चक्कर येणे, मळमळणे, जीभ किंवा त्वचा कोरडी पडणे, लघवीचे प्रमाण कमी व गडद होणे अशी लक्षणे आढळल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी. मधुमेह, रक्तदाब, पक्षाघात, मुतखडा असलेल्या शेतकऱ्यांनी अधिक काळजी घ्यावी.
- डॉ. विद्यानंद भिलारे, एमडी. मेडिसीन
तापमानवाढीमुळे पिकालाही दुपारचे पाणी देऊ नये. दुपारची औषधफवारणी पूर्ण टाळावी. शेतातले बाष्पीभवन टाळण्यासाठी मल्चिंग पेंपरचा, ठिबक सिंचन प्रणालीचा उपयोग करावा. रात्रीचे साप बाहेर निघत असल्याने शेतात गमबूट वापारावेत.
- भानुदास इधोळ, प्रमुख, आघारकर संशोधन केंद्र
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.