इंदापुरातील कालव्याची दुरुस्ती गरजेची | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंदापुरातील कालव्याची दुरुस्ती गरजेची
इंदापुरातील कालव्याची दुरुस्ती गरजेची

इंदापुरातील कालव्याची दुरुस्ती गरजेची

sakal_logo
By

शेटफळगढे, ता. १७ : इंदापूर तालुक्याच्या शेती सिंचनाला खडकवासला कालवा वरदान ठरलेला आहे. परंतु, गेल्या ३२ वर्षांपासून याच मुख्य कालव्याची दुरुस्ती झाली नसल्याने आवर्तनाच्या काळात या कालव्यातून पाणी पुढे जात नाही. याचा शेती सिंचनासाठी गरज असणाऱ्या उन्हाळ्याच्या काळात सर्वाधिक परिणाम होत आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील मुख्य कालव्याच्या वितरिकांच्या दुरुस्तीसाठी सरकारने निधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
शेटफळगढे गावच्या हद्दीपासून खडकवासला उपविभाग इंदापूर यांची हद्द सुरू होते. परंतु, दौंडचा उपविभाग असताना व त्यानंतर स्वतंत्र इंदापूरचा उपविभाग झाल्यानंतरही खडकवासला मुख्य कालव्याच्या दुरुस्तीला सरकारकडून मागील जवळपास ३२ वर्षांच्या काळात निधी मिळाला नाही. त्यामुळे या मुख्य कालव्यात मुख्य कालव्यात अनेक ठिकाणी दगडी बांधकामे व झाडेझुडपे पडलेली आहेत. तसेच, मोठ्या प्रमाणात गाळ व गवत झाले आहे. अशीच मुख्य कालव्याची परिस्थिती जवळपास खडकवासला प्रकल्पाच्या इंदापूर उपविभागाच्या अंकित असणाऱ्या ४२ किलोमीटर अंतरात आहे. त्यामुळे आवर्तन सुरू असतानाच्या काळात कालव्याच्या प्रवाहातून पाणी पुढे सरकत नसल्याने कालव्याच्या शेवटच्या भागापर्यंत पाणी अत्यंत कमी दाबाने मिळत आहे. सिंचित भागापर्यंत पाणी अत्यंत कमी दाबाने मिळत आहे.
याशिवाय वितरिकांना पाणी सोडण्यासाठी सध्या वापरात असलेल्या हेड रेग्युलेटरही नादुरुस्त झालेले आहेत. याशिवाय कर्मचाऱ्यांची ही संख्या अपुरी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने गरज असणाऱ्या उन्हाळ्याच्या काळात मुख्य कालव्यातून वाहणाऱ्या पाण्याची गती मंदावत आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने इंदापूर तालुक्यातील कालवे व वितरिकांच्या दुरुस्तीसाठी तत्काळ निधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

ओलीतखालील क्षेत्रात मोठी घट
इंदापूर तालुक्याच्या शेती सिंचनासाठी खडकवासला प्रकल्पाची निर्मिती झाल्यानंतर सुरवातीला या
प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात जवळपास १६ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येत होते. परंतु, मुख्य कालव्यातून पाणी पुढे जात नसल्याने व सिंचनाला पाणी कमी दाबाने उपलब्ध होत असल्याने सध्या केवळ दोन हजार हेक्टर क्षेत्र तालुक्यात या प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात सध्या ओलिताखाली येत आहे.