पावसाअभावी शेतकरी चिंतेत

पावसाअभावी शेतकरी चिंतेत

Published on

शेटफळगढे, ता. १६ : परिसरात प्रतिवर्षी मे महिन्यात पडणारा मॉन्सूनपूर्व पाऊस यावर्षी पडला नाही. अशातच जून महिन्याचा पहिला पंधरवडा संपला, तरी पावसाचा थेंबही न पडल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
परिसरात पाऊस नसल्याने विहीरी व कूपनलिका कोरड्या पडू लागल्या आहेत. त्यामुळे शेतात सध्या असलेला ऊस व मका, कडवळ यांसारखी हिरव्या चाऱ्याची पिके जळण्याच्या मार्गावर आहेत. तसेच, पिण्याच्या पाण्याचीही पाणी टंचाई जाणवू लागली आहे. पशुधनांना हिरवा चारा मिळण्यासाठी म्हसोबावाडी येथील शेतकरी बागायत भागातून गुंठेवारीवर मका व ऊस यासारखी पिके दुभत्या जनावरांच्या चाऱ्यासाठी घेऊन येत आहेत. मॉन्सूनपूर्व व नियमित पाऊस पडेल, या आशेवर शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या पेरणीसाठी मशागतपूर्व कामे करून ठेवली आहेत. मात्र, पाऊस नसल्याने परिसरातील शेतकरी चिंतेत पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आता पावसाकडे व हवामान खात्याच्या अंदाजाकडे लागल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com