निंबोडीत भर पावसात मिरवणूक

निंबोडीत भर पावसात मिरवणूक
Published on

शेटफळगढे, ता २ : भर पावसातच बैलांची मिरवणूक काढत निंबोडी (ता इंदापूर) येथील ग्रामस्थांनी बैलपोळा साजरा केला. दरवर्षीप्रमाणे बैलांची सजावट स्पर्धा घेतली जाते चांगली बैलांची सजावट करणाऱ्या शेतकऱ्याला मानधन व ट्रॉफी देण्याचे काम केले जाते यावर्षी देखील चांगल्या सजावटीसाठी ग्रामपंचायतीने व विठ्ठल रुक्मिणी प्रतिष्ठानच्यावतीने नियोजन केले होते यासाठी १२ बैल जोड्यांची व तीन देशी गाईंची सजावट स्पर्धेसाठी नोंदणी झाली होती .मात्र पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांसह ग्रामस्थांची दैना उडाली.
दरम्यान, समाधानकारक पावसाने शेतकरी मात्र आनंदीच होत आहे तर एका शेतकऱ्याने लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजना मंजूर झाल्याचा आनंद बैलाच्या अंगावर लिहून साजरा केला. यावेळी सरपंच नर्मदा घोळवे उपसरपंच दत्तात्रेय भापकर हनुमंत घोळवे दादा पाटील मनोज घोळवे ,संभाजी घोळवे ,बाळासाहेब घोळवे यांच्यासह विठ्ठल रुक्मिणी प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com