शेटफळगढे येथील सराईतास
दहशत निर्माण केल्याने अटक

शेटफळगढे येथील सराईतास दहशत निर्माण केल्याने अटक

Published on

शेटफळगढे, ता. २५ : येथील बारामती ॲग्रो साखर कारखान्याच्या परिसरातील हमाल चाळीसमोर तलवारीने दहशत निर्माण करणाऱ्या तरुणास भिगवण (ता. इंदापूर) पोलिसांनी अटक केली. बंटी ऊर्फ विक्रम मधुकर मचाले, असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, तो शेटफळगढे (ता. इंदापूर) येथील असल्याची माहिती भिगवण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनोद महांगडे यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ मार्चला सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास शेटफळगढे येथील कारखान्याच्या समोरील हमाल चाळीसमोर बंटी मचाले व त्याचे इतर २ ते ३ साथीदार हे हातात तलवार घेऊन भाऊ वैभव मचाले याच्याबरोबर झालेल्या भांडणाचा राग मनात धरून त्यांनी सुनील रॉय याला हाताने मारहाण केली. तसेच, हातात तलवार घेऊन मोठमोठ्याने आरडाओरडा करून शिवीगाळ करत कामगारांच्या दारावर दगड मारत त्या ठिकाणी दहशत माजविली. याप्रकरणी भिगवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यातील आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे. फोन बंद करून तो पसार झाला होता. पोलिसांनी गोपनीय बातमीदाराच्या मदतीने माहिती काढून त्यास २१ मार्चला अटक केली. त्याला इंदापूर न्यायालयाने २५ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस हवालदार महेश उगले हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com