तालुक्याच्या विकासाचे शिल्पकार...मामा
इंदापूर तालुक्याच्या विकासाला गती देणारा सर्वसामान्यांचा जिव्हाळ्याचा माणूस म्हणजे इंदापूरचे आमदार व क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रेय भरणे (मामा). तालुक्यातील जनतेच्या समस्यांसाठी मामा अहोरात्र प्रयत्न करतात त्या समस्यांचे निराकरण करतात आणि गोरगरिबांना न्याय देतात. इंदापूर तालुक्यातील गोरगरीब, कामगार, शेतकरी, महिला यांना न्याय देणारा खरा माणूस म्हणजे मामा. तालुक्याचे विकासाचे शिल्पकार मामा... मामांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्या कार्याचा घेतलेला एक मागोवा...
- बाळासाहेब तांबे, शेटफळगढे
इंदापूर तालुक्याचा इतिहास पाहिला आणि वर्तमान पाहिला तर इंदापूर तालुक्याचा विकास करताना कोण आपला, कोण दूरचा हे न पाहता मंत्री दत्तात्रेय भरणे मामांनी तालुक्यातील प्रत्येक गावाचा, वाड्या, वस्त्यांचा विकास कसा होईल. याकडे नेहमी लक्ष दिले आहे. त्यांचा राजकीय प्रवास हा एक सर्वांना प्रेरणादायी असा प्रवास आहे. शेतकरी, छत्रपतीचे संचालक, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक, बँकेचे अध्यक्ष, छत्रपतीचे अध्यक्ष, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, आमदार, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री असा एक संघर्ष करणारा त्यांचा मोठा प्रवास आहे.
सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य
कॅबिनेटमंत्री दत्तात्रेय भरणे हे इंदापूर तालुक्यातील शेतकरी, गोरगरीब, मजूर, कामगार, कष्टकरी, विद्यार्थी, महिला यांना न्याय मिळवून देण्यासाठी ते नेहमी प्रयत्न करत असतात. तालुक्याच्या राजकारणापासून त्यांनी सुरुवात केल्यानंतर सर्वसामान्य माणसांचे प्रश्न कसे सोडवले जातील. तालुक्यातील गावांचा विकास कसा होईल. यासाठी त्यांनी नेहमी प्रयत्न केला आहे आणि करत आहेत. तालुक्याच्या राजकारणात त्यांनी प्रवेश केल्यानंतर त्यांनी जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे कर्ज प्रकरणे मोठ्या प्रमाणात केली. शेकडो गोर, गरीब कुटुंबांना जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ मिळवून दिला. घरकुल योजना, यशवंत घरकुल, समाज कल्याण विभागातून मागासवर्गीय घटकातील लोकांना वेगवेगळ्या योजनांचा लाभ मिळवून दिला.
लाकडी निबोंडी उपसा सिंचन योजना मार्गी
महिलांसाठी महिला बालकल्याण विभागातून पिठाची चक्की शिलाई मशिन, जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातून शेतकऱ्यांना साडेसात एचपी पर्यंत विद्युत पंप, पीव्हीसी पाइप अशा वेगवेगळ्या योजनांचा लाभ मिळवून देण्याचे काम मामांनी केले आहे. आमदारपदाची जबाबदारी सांभाळत असताना वाडी, वस्ती तेथे रस्ता, सार्वजनिक सभागृह, पिण्याच्या पाण्याची सुविधा, शाळा, वीजपुरवठा व इतर सुविधा निर्माण केल्या. तालुक्यातील बागायती क्षेत्र वाढावे, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. तालुक्यातील लाकडी निबोंडी उपसा सिंचन योजना मार्गी लावण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून मार्गी लावली.
तालुक्यात गावोगावी रस्त्यांचे जाळे
त्याचबरोबर खडकी-पारवडी- शेटफळगढे ते भवानीनगर रस्ता तसेच भिगवण ते बारामती रस्ता सिमेंट काँक्रिटचा केला. याचबरोबर तालुक्यात गावोगावी रस्त्याचे जाळे निर्माण केले आहे. कार्यकर्त्याचा सर्वसामान्य व्यक्तीच्या प्रश्नाची सोडण्याबाबत व त्या व्यक्तीचे काम मार्गी लावण्याचे काम करीत असतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.