नैसर्गिक शेती अभियानांतर्गत म्हसोबावाडी येथे प्रशिक्षण
शेटफळगढे, ता. ६ : म्हसोबावाडी (ता. इंदापूर) येथे राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षणाचा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमात म्हसोबावाडी, तसेच अकोले येथील शेतकऱ्यांनी भाग घेतला. या कार्यक्रमासाठी भिगवण मंडलचे कृषी अधिकारी किरण पिसाळ यांनी नैसर्गिक शेती विषयीमाहिती दिली. तसेच, सध्या नैसर्गिक शेती करणे काळाची गरज का आहे? याविषयी माहिती दिली. रासायनिक शेतीने होणारे आरोग्याचे तोटे, तसेच जमिनीची नापिकता याविषयी माहिती दिली.
यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे अल्पेश वाघ यांनी नैसर्गिक शेती कशी करायची? याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. जीवामृत कसे बनवायचे? दसपर्णी अर्क कसा बनवायचा? गांडूळ खत कसे बनवायचे? याबाबत मार्गदर्शन केले. तसेच सेंद्रिय शेती प्रशिक्षक अभिजित पवार यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी विजय बोडके, आशिष भोसले, सचिन क्षीरसागर, सचिन मोरे, पल्लवी काळे, मनीषा चांदगुडे, गीता दराडे, सरपंच राजेंद्र राऊत, सोनाली गवळी आदी उपस्थित होते. मनोज चांदगुडे यांनी सूत्रसंचालन केले.
01662