लाकडी- कळस रस्ता खड्डेमय
शेटफळगढे, ता. २४ : इंदापूर तालुक्यातील महत्त्वाचा समजला जाणारा लाकडी- कळस रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. परिणामी अपघाताचे प्रमाणही वाढले आहे.
या रस्त्यावर गेल्या काही दिवसांपूर्वीच खड्डे बुजविण्याचे काम केले होते. मात्र, या रस्त्यावरून अवजड हायवा, तसेच ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्याने खड्ड्यांचे प्रमाण वाढले आहे. या खड्ड्यांमुळे ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर पडण्याचे प्रमाणही वाढले आहे. बांधकाम विभाग मात्र हे खड्डे बुजविण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे परिसरातील नागरिक सांगत आहेत. हा रस्ता लोणी व बारामती एमआयडीसी यांना जोडणारा जवळचा मार्ग आहे. त्यामुळे या रस्त्यावर मोठी वर्दळ असते. मात्र, लाकडीपासून काही अंतरावर कळसच्या दिशेने जात असताना रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता, अशी अवस्था या रस्त्याची झाली आहे. मोठ्या वाहनांबरोबरच छोट्या वाहनांना देखील अडचणींचा सामना करावा लागत आहे. या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी वाहनचालक व नागरिक करीत आहेत.
हायवाची गती कोण रोखणार?
या रस्त्यावरून भरधाव वेगाने हायवा मुरूम वाहतूक करीत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. मोठ्या वाहनांची गती अधिक असल्याने लहान वाहनचालकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. मात्र, हायवाची गती कमी होत नसल्याने या रस्त्यावर बेकायदेशीररीत्या वाहणाऱ्या हायवांची गती कमी कोण करणार? असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
लाकडी- कळस रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी संबंधित काम करणाऱ्या ठेकेदाराला लेखी सूचना दिल्या आहेत.
- शशी तुपे, उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, भिगवण
01677
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

