

शेटफळगढे, ता. २१ : महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनतर्फे आयोजित पहिल्या महिला व्यावसायिक ‘मिंटोनेट प्लस ज्युनिअर व्हॉलीबॉल लीग’मध्ये ‘पुणे फिनिक्स’ संघाने विजेतेपद पटकावले. मुंबईतील नेरूळ जिमखाना येथे झालेल्या अंतिम सामन्यात पुणे फिनिक्सने नाशिक एसी गर्ल्सचा पराभव केला. या ऐतिहासिक विजयात म्हसोबाचीवाडी (ता. इंदापूर) येथील सात खेळाडूंनी अष्टपैलू कामगिरी करत मोलाचा वाटा उचलला.
विजेत्या संघात म्हसोबाचीवाडीतील साक्षी साळुंखे, प्रक्रिया पवार, समृद्धी चांदगुडे, श्रावणी चांदगुडे, तनवी साळुंखे, अक्षदा पवार आणि सिद्धी जानकर यांचा समावेश होता. संघाचे नेतृत्व वेदिका शिंदे हिने केले, तर उपज्ञा कारले, देवकी रावत, गीत सागजकट, अनया डिसा, विशाखा मोरे व श्रुती राऊत यांनी उत्तम साथ दिली. नाशिकच्या वर्षा काळे हिला ‘बेस्ट लिबरो’ पुरस्कार मिळाला.
संघाच्या मालक शिल्पा गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षक किरण पवार व श्रुती माशाळे यांनी ही रणनीती आखली होती. ग्रामीण भागातील मुलींच्या या यशामुळे म्हसोबाचीवाडी परिसरात अभिनंदनाचा वर्षाव होत असून, हे यश उदयोन्मुख खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरले आहे.
01737
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.