वीज कोसळल्याने गाय-वासराचा मृत्यू

वीज कोसळल्याने गाय-वासराचा मृत्यू

सुपे, ता.२५ः काऱ्हाटी (ता.बारामती) येथील सुनंदा शिवाजी लोणकर यांच्या मालकीच्या दुभती जनावरे बांधलेल्या झाडावर वीज पडून गाय व वासरू मृत्यूमुखी पडले. ही घटना बुधवारी (ता.२४) सायंकाळी सव्वासहाच्या दरम्यान घडली. या घटनेचा पंचनामा तलाठी बाबासाहेब भागवत यांनी केला. सव्वा लाखांचे नुकसान झाल्याने लोणकर यांनी भरपाईची मागणी केली आहे.
पंचनाम्यसप्रसंगी पोलिस पाटील संजय लोणकर, योगेश लोणकर, शेखर खंडाळे उपस्थित होते. नुकसान भरपाई मिळण्याची लोणकर कुटुंबीयांची मागणी आहे. दरम्यान, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत जनावरांचे शवविच्छेदन केल्याची माहिती संजय लोणकर यांनी दिली. हे कुटुंब आर्थिकदृष्ट्या गरीब असल्याने गावकऱ्यांना मदतीचे आवाहन केल्याचे लोणकर यांनी सांगितले. सुनंदा लोणकर यांचा मुलगा निखिल व सासू-सासरे असे चौघे जण येथे राहतात. पाच वर्षांपूर्वी वडील वारल्याने कुटुंबाची जबाबदारी निखिल व त्याच्या आईवर आहे. निखिल एका कंपनीत नोकरी करतो. कामावरून तो नुकताच घरी आला होता. त्याने सांगितले की, बुधवारी सायंकाळी अचानक वारे सुटले. यावेळी काही क्षणात वीज कडाडल्याचा मोठा आवाज आला. बाहेर येऊन पाहिले तर गाय व वासरू मृतावस्थेत पडलेले दिसले. माझे दैव बलवत्तर म्हणून मी वाचलो. चार वर्षे वयाची नऊ महिन्यांची गाभण असलेली गाय व सात महिन्यांचे वासरू या दुर्घटनेत गेले. उन्हाळ्यामुळे गोठ्याऐवजी बाहेर झाडाखाली गुरे बांधली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com