सुप्यातील पूनमची राष्ट्रीय एनएसएस शिबिरासाठी निवड

सुप्यातील पूनमची राष्ट्रीय एनएसएस शिबिरासाठी निवड

Published on

सुपे, ता. २५ : विद्या प्रतिष्ठानच्या सुपे (ता. बारामती) येथील सुपे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाची विद्यार्थिनी पुनम नंदकुमार चांदगुडे हिची राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत राष्ट्रीय एकात्मिक शिबिर २०२६साठी राष्ट्रीय स्तरावर निवड झाल्याने परिसरातून तिचे अभिनंदन होत आहे.
महाराष्ट्रातून पाच स्वयंसेवक व पाच स्वयंसेविका असा एकूण १० सदस्यांचा संघ २४ फेब्रुवारी ते २ मार्च २०२६ या कालावधीत होणाऱ्या या प्रतिष्ठित शिबिरासाठी निवडला आहे. या संघातून राज्याचे प्रतिनिधित्व राष्ट्रीय पातळीवर केले जाणार असून, त्यामध्ये पूनमची निवड विशेष उल्लेखनीय ठरली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्यावतीने राज्यातून निवडलेल्या संघात तीचा समावेश झाला आहे. या यशामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्याची माहिती प्राचार्य डॉ. संजय काळे, कार्यक्रम अधिकारी प्रा. निकिता गाडेकर यांनी दिली.
या शिबिराचे आयोजन कर्नाटकातील केएलई शताब्दी अधिवेशन केंद्र, जेएनएमसी कॅम्पस येथे एनएसएसचे प्रादेशिक संचालनालय, बेंगलुरू यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे. या शिबिरामुळे राष्ट्रीय एकात्मता, सांस्कृतिक देवाण-घेवाण, नेतृत्व विकास, सामाजिक उपक्रम आणि संवाद सत्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यापक राष्ट्रीय अनुभव मिळणार आहे. शिबिरादरम्यान महाराष्ट्राच्या समृद्ध, सांस्कृतिक वारशाचे सादरीकरण करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी या संघावर असणार आहे. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून पूनमची निवड झाली आहे. पूनमच्या या राष्ट्रीय निवडीबद्दल संस्थेचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक व परिसरातून अभिनंदन होत आहे.


02377

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com