सुपे महाविद्यालयात सायबर सुरक्षा कार्यशाळा
सुपे, ता. ३ ः विद्या प्रतिष्ठानच्या सुपे (ता. बारामती) येथील सुपे महाविद्यालयात डिजिटल नागरिकत्व आणि सायबर नीतिमत्ता या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा आयोजिली होती. बारामतीच्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या संगणक शास्त्र विभागाचे प्रा. डॉ. उपेंद्र चौधरी यांनी सायबर सुरक्षा, ऑनलाइन धोके, गुन्हे, वैयक्तिक माहितीचे संरक्षण याविषयी माहिती दिली. सोशल मिडीयाचा वापर, डिजिटल व्यवहारात घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले. आजच्या डिजिटल युगात सायबर सुरक्षिततेचे महत्त्व अधोरेखित केले.
प्रा. राहुल शहा यांनी डिजिटल नागरिकत्व, सायबर एथिक्स आणि संबंधित कायदे, नैतिक मूल्यांचे पालन, ऑनलाइनची जबाबदारी, माहिती तंत्रज्ञान कायद्याची मुलभूत माहिती याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संजय काळे होते. प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. ज्योती शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन विद्यार्थिनी अमृता ढोपरे हिने केले. तर आभार विद्या चांदगुडे हिने मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

