शिरूरला बेकायदा दारूविक्री करणाऱ्यावर कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिरूरला बेकायदा दारूविक्री
करणाऱ्यावर कारवाई
शिरूरला बेकायदा दारूविक्री करणाऱ्यावर कारवाई

शिरूरला बेकायदा दारूविक्री करणाऱ्यावर कारवाई

sakal_logo
By

शिरूर, ता. ४ : मलठण (ता. शिरूर) जवळील हॉटेल ओमकारच्या आडोशाला देशी-विदेशी दारूच्या बाटल्यांची बेकायदा विक्री करणाऱ्याला शिरूर पोलिसांनी ताब्यात घेतले. मंगळवारी रात्री उशिरा केलेल्या या कारवाईत, सुमारे तीन हजार रुपये किमतीच्या २५ देशी-विदेशी दारूच्या बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या.

नितीन एकनाथ चोरे (वय ४०, रा. डोंगरगण, ता. शिरूर, जि. पुणे) असे ताब्यात घेतलेल्या दारुविक्रेत्याचे नाव आहे. समजपत्र देऊन त्याला सोडले असल्याचे या प्रकरणाचा तपास करणारे पोलिस हवालदार डी. आर. थेऊरकर यांनी सांगितले.

मलठण येथील ओमकार ढाब्याच्या आडोशाला देशी-विदेशी दारूची बेकायदा विक्री चालू असल्याची माहिती समजताच रात्री उशिरा पोलिसांच्या पथकाने त्या परिसरात छापा टाकला. त्यावेळी नितीन चोरे हा दारूविक्री करीत होता. त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून देशी-विदेशी दारूच्या २५ बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या.

दरम्यान, मलठण, आमदाबाद फाटा या परिसरातील अनेक ढाब्यांवर देशी-विदेशी दारूची बेकायदा विक्री केली जात असल्याची स्थानिक ग्रामस्थांची तक्रार असून, हॉटेल व ढाब्यांसह इतरत्रही बेकायदेशीरपणे दारूविक्री होत आहे. मलठण ग्रामपंचायतीने या बेकायदा दारूविक्री बंदीचा ठराव केला असून, राज्य उत्पादन शुल्क विभाग, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक तसेच शिरूरचे पोलिस निरीक्षक यांच्याकडेही लेखी तक्रार केली आहे. बेकायदा दारूविक्रेत्यांचा बीमोड करून दारूविक्रीचा नायनाट करावा, अशी आग्रही मागणी केली आहे.