
दौंडमधील शेतकऱ्याची सुमारे अडीच लाखांची फसवणूक
शिरूर, ता. १९ : बंगळूर येथील कंपनीच्या सीएसआर फंडातून शेततळ्यासाठी पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवीत, पण त्यासाठी दहा टक्के आगाऊ रक्कम कंपनीकडे भरावी लागेल, असे सांगत दौंड तालुक्यातील एका शेतकऱ्याची सुमारे दोन लाख ३५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली.
याबाबत संतोष हरिश्चंद्र चव्हाण (रा. दौंड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलिसांनी नवनाथ शिवाजी बारस्कर (रा. लाटेआळी, शिरूर) याच्याविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
फिर्यादी चव्हाण यांनी आपल्या बॅंकेच्या खात्यावरून वेळोवेळी दोन लाख ३५ हजार रुपये संशयित आरोपी बारस्कर याने सांगितलेल्या बॅंक खात्यावर पाठविले. दहा टक्के रक्कम पाठविल्यानंतर चव्हाण यांनी सीएसआर फंड मिळण्याबाबत चौकशी केली असता, बारस्कर याने उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर तो फोनदेखील घेत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच चव्हाण यांनी शिरूर पोलिसांकडे धाव घेत फिर्याद दिली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुनील उगले करीत आहेत.
-------------