ऊसतोड मुकादमांविरूद्ध
शिरूरला फसवणुकीचा गुन्हा

ऊसतोड मुकादमांविरूद्ध शिरूरला फसवणुकीचा गुन्हा

Published on

शिरूर, ता. ९ : ऊसतोड कामगार पुरविण्यासाठी वेळोवेळी उचल म्हणून सुमारे ३१ लाख साठ हजार रुपये घेऊन प्रत्यक्षात ऊसतोड कामगार न पुरविणाऱ्या आणि शिरूर तालुक्यातील शेतकऱ्याची फसवणूक करणाऱ्या दोघा ऊसतोड मुकादमांविरूद्ध शिरूर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
दत्तात्रेय किसन गायकवाड (रा. मलठण, ता. शिरूर) या शेतकऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलिसांनी गणेश बन्सी राठोड व लहू बढी चव्हाण (दोघे रा. तुपेवाडी तांडा, पो. बावणे पांगरी, ता. बदनापूर, जि. जालना) यांच्याविरूद्ध शिरूर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गायकवाड यांची ऊसशेती असून, त्यांना ऊसतोड मजुरांची गरज असल्याने त्यांनी जानेवारी २०२१ मध्ये राठोड व चव्हाण यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा त्यांनी ऊस कामगार पुरविण्यासाठी उचल मागितली. त्यानंतर प्रत्यक्षात ऊसतोड कामगार न पुरवता, ऊसतोड कामगारांना उचल म्हणून देण्यासाठी गायकवाड यांच्याकडून वेळोवेळी सुमारे ३१ लाख साठ हजार रुपये उकळले. गायकवाड यांनी त्यानंतरही मजुरांची किंवा पैशांची मागणी केली असता टाळाटाळ केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने गायकवाड यांनी शिरूर पोलिसांकडे धाव घेत फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून शिरूर पोलिसांनी राठोड व चव्हाण यांच्याविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.