शिरूर येथे शेतकऱ्यांसाठी आंदोलन

शिरूर येथे शेतकऱ्यांसाठी आंदोलन

Published on

शिरूर, ता. २५ : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी, राष्ट्रीय समाज पार्टी व जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाच्यावतीने मंगळवार (ता. २८) पुणे-नगर रस्त्यावर न्हावरे फाटा (ता. शिरूर) येथे रास्तारोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष शिवाजी कुऱ्हाडे यांनी दिली.

रासप व जनता दलाच्यावतीने याबाबतचे निवेदन प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले. जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथा शेवाळे, रासपाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, महासचिव माऊली सलगर यांच्यासह प्रमुख नेते या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती शिवाजी कुऱ्हाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आंदोलनाबाबत माहिती देताना कुऱ्हाडे यांनी सांगितले की, सध्या शेतीमालाला बाजार भाव नसल्यामुळे शेतकरी वर्ग हतबल झाला आहे. शिरूर, आंबेगाव, खेड, जुन्नर, श्रीगोंदा, पारनेर, दौड या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा पिकाचे उत्पादन घेतले जाते. मात्र गेली वर्षभर कांद्याचे बाजारभाव उत्पादन खर्चापेक्षा कमी असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. सध्या कांद्याच्या काढणीला सुरवात झाली असून नवीन कांद्याला सुद्धा मातीमोल भाव मिळत असल्यामुळे शेतकरी शेतकरी आर्थिक अडचणीत येत आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना वीज बिल, कर्ज माफ करणे गरजेचे आहे. या विरोधात कोणतेही प्रस्थापित पक्ष आवाज उठवत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.


शिरूर तालुक्यात बिबट्याचे प्रमाण वाढले असून गावोगाव बिबटे मनुष्य व पशुधनावर हल्ले करीत आहेत त्यामुळे त्यांना बिबट्या पासून संरक्षण मिळावे यासाठी वन विभागाने कायमस्वरूपी प्रतिबंधक उपाय योजना करण्याची गरज आहे. बिबट्याच्या भीतीमुळे शेतीला दिवसा सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत वीज मिळावी, कांद्याला हमी भाव द्यावा, मेंढपाळांना चराऊ कुरणे द्यावेत, राज्यात विविध ठिकाणी मेंढपाळावर हल्ले होत असून त्यांना संरक्षण मिळावे आदी मागण्यांसाठी हा आंदोलन होत असून सर्व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने न्हावरे फाटा (ता. शिरूर ) येथे उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव खेडकर, रासप नेते रामकृष्ण बिडगर, शिरूर-आंबेगाव विधानसभा अध्यक्ष किरण शिंदे, युवक आघाडीचे अध्यक्ष किरण शेडगे, उपाध्यक्ष संताजी तिखोळे आदी उपस्थित होते. या आंदोलनाला अनेक समविचारी पक्ष, संघटनांनी पांठीबा दिल्याची माहिती रामकृष्ण बिडकर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com