नियमांचे उल्लंघन केल्याने सदरवाडी येथे लॉजवर छापा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नियमांचे उल्लंघन केल्याने सदरवाडी येथे लॉजवर छापा
नियमांचे उल्लंघन केल्याने सदरवाडी येथे लॉजवर छापा

नियमांचे उल्लंघन केल्याने सदरवाडी येथे लॉजवर छापा

sakal_logo
By

शिरूर, ता. २९ : नोंद रजिस्टरमध्ये अनियमितता व नियमांचे उल्लंघन केल्याने सरदवाडी (ता. शिरूर) येथील विघ्नहर्ता लॉजच्या मालकासह व्यवस्थापकावर शिरूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सहायक पोलिस निरीक्षक संदीप यादव यांनी शिरूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पुणे - नगर रस्त्यावर पथकासह गस्त घालत असताना विघ्नहर्ता लॉजवर छापा टाकला. लॉजवरील रजिस्टरच्या तपासणीदरम्यान, लॉजवर येणाऱ्या - जाणाऱ्या लोकांच्या नोंदीमध्ये अनियमितता दिसून आली. तसेच दर्शनी भागात लॉजचा परवाना लावण्यात आलेला नव्हता. याबाबत तेथे उपस्थित असणारांना विचारणा केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
प्रशासकीय नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वैभव मनोहर गाडीलकर (रा. बाबूराव नगर, शिरूर) व भूषण मारुती भोलवणकर (रा. सरदवाडी) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस हवालदार प्रफुल्ल भगत पुढील तपास करीत आहेत.