शिरूरमध्ये २५० किलो गोमांस जप्त

शिरूरमध्ये २५० किलो गोमांस जप्त

शिरूर, ता. १० : गोमांसाची बेकायदा वाहतूक करणारी मोटार पकडून पोलिसांनी या मोटारीतून तीस हजार रुपये किमतीचे सुमारे २५० किलो गोमांस जप्त केले. पुणे-नगर रस्त्यावर सतरा कमानीच्या पुलाजवळ रविवारी (ता. ९) दुपारी ही कारवाई केली.
गोमांसाची बेकायदा वाहतूक व विक्रीप्रकरणी मुजीफ खल्लील कुरेशी व अब्दुलहक जल्लाल कुरेशी (दोघेही रा. मामलेदार कचेरीजवळ, नगर) यांच्याविरूद्ध शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, गोमांसाच्या वाहतुकीसाठी वापरलेली व्हॅन देखील पोलिसांनी जप्त केली आहे. शिरूर गावाबाहेरून जाणाऱ्या (पुणे-नगर) रस्त्यावरून गोमांस घेऊन व्हॅन येत असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी सतरा कमानीच्या पुलाजवळ सापळा रचून व्हॅन ताब्यात घेतली. दरम्यान, ही व्हॅन शिरूर पोलिस ठाण्यात आणल्यानंतर पोलिसांशी संशयित आरोपींची व स्थानिक काही लोकांची बाचाबाचीही झाली.
व्हॅनमधून जप्त केलेल्या मांसाची जनावरांच्या डॉक्टरांकडून तपासणी केली असून, हे गोमांसच असल्याचे सिद्ध झाल्याने त्याची वाहतूक व विक्री करणारे मुजीफ कुरेशी व अब्दुलहक कुरेशी यांच्याविरूद्ध प्रतिबंधित गोमांसाची वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याची माहिती या प्रकरणाचा तपास करणारे पोलिस उपनिरीक्षक एकनाथ पाटील यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com