जेवण करत नसल्यावरून
आईची मुलीला मारहाण

जेवण करत नसल्यावरून आईची मुलीला मारहाण

Published on

शिरूर, ता. २६ : जेवण करीत नसल्याच्या कारणावरून आपल्याच ११ वर्षे वयाच्या मुलीला आई काठीने मारहाण करीत असल्याचा व चटके देत असल्याचा प्रकार शिरूर तालुक्यात घडला. गेले दहा-बारा दिवस चालू असलेला हा प्रकार संबंधित पिडीत मुलीच्या शाळेतील शिक्षिकेमुळे उघडकीस आला.
संबंधित मुलगी शाळेत आल्यावर तीच्या अंगावरील वळ आणि पायाला भाजल्याच्या जखमा पाहिल्यावर शिक्षिकेने तीला विश्वासात घेऊन विचारले असता संबंधित मुलीनेच आईने केलेल्या मारहाणीची व चटके दिल्याची माहिती दिली. घरी जेवण करीत नसल्याच्या कारणावरून आईने अनेकवेळा काठीने मारहाण केली व चमचा गरम करून त्याने चटके दिल्याची, तसेच शिवीगाळ व दमदाटी केल्याची माहिती मिळाल्यावर संबंधित शिक्षिकेने मुलीसह थेट पोलिस ठाणे गाठले. संबंधित शिक्षिकेच्या फिर्यादीनूसार पिडीत मुलीच्या आईविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मुलीच्या आईला ताब्यात घेतले असल्याचे पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.