

शिरूर, ता. १८ : येथील साहिल दत्तात्रेय बांदल या गिर्यारोहाकाने ७७व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत युरोप खंडातील सर्वोच्च माउंट एलब्रूस हे शिखर मंगळवारी (ता. १५) सकाळी साडेपाचच्या सुमारास सर केले. तसेच, माउंट एलब्रूस बेस कॅम्पवर ११५ फूट लांबीचा तिरंगा फडकावण्याचा आगळावेगळा विश्वविक्रम प्रस्थापित केला.
माउंट एलब्रूस हे जगातील सात खंडातील सात सर्वोच्च शिखरांपैकी पाचव्या क्रमांकाचे शिखर असून, याची उंची १८ हजार ५१० फूट आहे. जॉर्जिया देशाच्या सरहद्दीपासून वीस किलोमीटर अंतरावर हे शिखर वसलेले असून, पृथ्वीवरील सर्वात उंच असलेल्यापैकी एक निद्रिस्त ज्वालामुखी पर्वत आहे.
११ ऑगस्टपासून सुरु झालेल्या या मोहिमेत साहिल याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. वेगाने वाहणारे वारे, उणे २५ अंश तापमान या सर्व अडचणींचा सामना करत त्याने १५ ऑगस्ट रोजी रशियन वेळेनुसार सकाळी साडेपाच वाजता शिखरमाथ्यावर तिरंगा ध्वज फडकावला. या आधी त्याने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक शिखरे सर केली आहेत. सन २०१९ मध्ये आफ्रिका खंडातील सर्वोच्च ‘माउंट किलिमांजारो’ हे शिखर सर करून तेथे सर्वात मोठा राष्ट्रध्वज फडकवण्याचा विश्वविक्रमही त्याच्या नावावर नोंदला गेला आहे. गिर्यारोहाणातील बेसिक व ॲडव्हान्स कोर्स तसेच बेसिक रॉक क्लाइंबिंग कोर्स त्याने ‘अ’ श्रेणीसह पूर्ण केले आहेत. लवकरच दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात उंच माऊंट ऍकोनकागुआ शिखर सर करणार असल्याचे त्याने ‘सकाळ’ला सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.